Mumbai: किरकोळ वाद विकोपाला, गावाला जाण्यासाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं
मुंबई गुन्हेगारीच्या बातम्या: मुंबईच्या चार्कॉप येथून एक खळबळजानक बातमी समोर आली आहे? यात एका गृहनिर्माण सोसायटीतील बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुराने पैशांच्या वादातून स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी चारकोप पोघेतलेस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
गावाला जाण्यासाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दसा राणा हा पत्नी हिमेंद्रीसोबत राहत होता. गावाला जाण्यासाठी त्याने पत्नींकडे पैसे मागितले, मात्र तिने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात दसा राणाने पत्नीला मारहाण करून तिचा गळा आवळून खून केला. मृत महिलेची ओळख हिमेंद्रि राणा अशी असून ती बालांगीर (ओडिशा) जिल्ह्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक
गडचिरोली : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे आमिष दाखवून शिक्षक दांपत्याची 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अहेरी येथे समोर आला आहे. याप्रकरणी अहेरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहेरी येथील विलास खरवडे आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा खरवडे यांनी आपल्या मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी फेसबुकवर एक जाहिरात बघून त्यावर संपर्क साधला. तेव्हा समोरून एका महिलेने माहिती दिली. त्यानंतर छत्तीसगडमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत दिल्ली येथील अमित कुमार नामक व्यक्तीने शिक्षक दांपत्याकडून तीन टप्प्यात तब्बल 25 लाख उखळले. अमित कुमारने 90 लाखांची मागणी केली होती. 65 लाखात प्रवेश देण्याचे ठरल्यानंतर खरवडे दाम्पत्यांनी 25 लाख दिले. मात्र पैसे मिळतात अमित कुमारने फोन घेण्यास किंवा संवाद करण्यास टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच खरवडे दाम्पत्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.