मुंडे साहेब जिल्ह्यात आले की पाऊस पडायचा,  आता मी आले की पडला; पंकजा मुंडे यांचे भावनिक भाषण

पंकाजा मुंडे बीड: भगवान बाबा यांना देखील मी माझे बाबा मानते. जे मला साक्षात दिसले. प्रत्येक श्वास मी मुंडे साहेबांना आणि भगवान बाबांप्रमाणे घेते. राजकारणात मला यायचं नव्हतं ,मुंडे साहेबांनी मला आणलं. मी संपूर्ण जीवन समाजाला दिला आहे. मुंडे साहेबांनी मला तुमच्या ओटीत घातले आहे. आपलं अद्भुत नातं आहे असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक भाषण केलंय. पाटोदा येथील श्री संत भगवान बाबा जन्मोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सत्तेचा उपयोग झाला पाहिजे. सामान्य माणसाचा वाली बनण्यासाठी मी राजकारणात आहे. भगवान भक्ती गडावर भगवान बाबा पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचतानाची मूर्ती देशात कुठेही नाही.  मुंडे साहेब जिल्ह्यात आले की पाऊस पडायचा. त्यानंतर मी आल्यानंतर पाऊस पडला. भगवान बाबांच्या ओढीने मी इथे आले असही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,”शिवशक्ती परिक्रमे दरम्यान मी या कार्यक्रमात आले होते. शिवाचं आणि माझं काही तरी नाते आहे. मी पुन्हा येईल असा शब्द इथे देते. सत्तेचा उपयोग आणि उपभोग सामान्य माणसाचा वाणी आणि वाणी बनण्यासाठी मी राजकारणात आहे. भगवान भक्ती गडावर कीर्तनासाठी शर्मा महाराज यांना मी आमंत्रण दिलं. भगवान भक्ती गडावर भगवान बाबा पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचतानाची मूर्ती जी देशात कुठेही नाही, ती पाहण्याची संधी मला मिळाली. भगवान बाबांच्या ओढीने मी इथे आले. भगवान बाबांची सावरगावला येण्याची इच्छा झाली आणि ते माझ्या माध्यमातून झाली. भगवान बाबांच्या लेकीने हा संकल्प पूर्ण केला. वामन भाऊ कर्मट होते, भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवान गडावर गेल्यानंतर मी भगवान बाबांना माझ्यासोबत चला असे म्हटले; त्यानंतर भगवान बाबा माझ्यासोबत साक्षात आले.”

माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, कर्मावर विश्वास आहे. कर्म फार महत्त्वाचे आहे, जे आपण करतो तेच आपल्याला मिळतं. कलयुगात कर्माचे फळ चांगले व वाईट लगेच मिळतात. काहींना करोडो रुपये खर्चूनही इतकं प्रेम मिळत नाही. दुसऱ्या राजकारण्यांना हे सर्व करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, मला मात्र एक दमडीही मोजावी लागत नाही. साक्षात प्रज्ञा नंदजी सरस्वती शंकराचार्यांनी मला दीक्षा दिलेली आहे आणि मी त्याच मार्गावर आहे. हे लोक जाऊ देत नाहीत, तोपर्यंत नाहीतर माझा देखील तुमच्यासारखाच विचार आहे.”असही त्या म्हणाल्या.

मुंडे साहेबांनी मला तुमच्या ओटीत घातले

“मुंडे साहेबांनी मला राजकारणात यायचं नव्हतं; मी घर कोंबडी मुलगी आहे. मी आई-वडिलांना सोडून कधी राहिले नाही. निवडणुकीत माझ्या लेकराला सोडून मी राहिले. संपूर्ण जीवन समाजाला दिले आहे. मुंडे साहेबांनी मला तुमच्या ओटीत घातले आहे; ही अतूट नाते आपल आहे. आज जे काही मी करते, तो प्रत्येक श्वास मुंडे साहेब आणि भगवान बाबांना शोभेल असाच घ्यायचा प्रयत्न आहे. युद्धात जाताना हातातली तलवार खाली ठेवायची नाही. मी जीवनात हेवा-द्वेष कुणाच्या काड्या नाही केल्या. लोक बोलली असतील, पण मी त्यांच्यावर कधीही राग केला नाही.”

मुंडे साहेब बोलायचे, माणसांनी कधीही बेरजेचे गणित करावे, बेरजेपेक्षा गुणाकाराचे गणित करण्याची आता वेळ आली आहे. माझी सत्ता भगवान बाबा आणि तुमच्या पायाशी मी अर्पण करते. झोपलेल्या समाजाबरोबर काम करणं, त्या समाजाचे डोळे आणि पाठीमागे उभे राहण्यासाठी माझं आयुष्य वेचण्याचा संकल्प आहे.

महाकालीसारखे रूप घ्यायचे आहे…

आपण देवाला संतांना जातीप्रमाणे वाटून टाकलं. माझ्याकडे जातिभेद नाही. पर्यावरणासारखे खात माझ्याकडे आहे. एक स्त्री म्हणून काम करत असताना सक्षमतेने काम करत आहे. आता काळ बदलला आहे. कलयुग आहे; महाकाली सारखे रूप पण घ्यायचे आहे. मातृत्व आणि दातृत्व द्यायचं आहे. एक स्त्री राजकारण करत असताना घर कशी सांभाळते तसेच ती राज्य आणि देश सांभाळू शकते, हा विश्वास मोदी यांनी आमच्यावर टाकलेला आहे. पशुसंवर्धन खात्याला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि देशात देखील तो निर्णय गेला.

आमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे भले नाही पण वाईट झाले नाही पाहिजे. पाच वर्षाचा राज्य आहे; आम्हाला राजाने राजा सारखे राहिले पाहिजे. राजाला सर्व रंग सारखे दिसले पाहिजेत, मग तो कोणीही असो. तो प्रयत्न माझा राहिला आहे. मी मुंडे साहेबांच्या भूमिकेत होते, आता आईच्या भूमिकेत आहे. आईला वाईटपणा स्वीकारावा लागतो. तुम्हाला शिस्त लावून चांगलं घडवणं हे माझं कर्तव्य आहे. आता शिवपुराण ऐकले; पुढच्यावेळी रामायण ऐकू. सर्वांचे मंगल करण एवढीच प्रार्थना करते. आता आहे तसं नाही, पूर्वी होतं तसे होऊ दे. शिवरायांच्या महाराष्ट्रात सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. ते स्वराज्य होतं. त्यामुळे आपण सन्मानाने जगत आहोत; हा सन्मान छत्रपती शिवरायांमुळे आहे.

आणखी वाचा

Comments are closed.