लाडक्या बहिणी अजून खुश होणार; मोदींच्या GST कपातीनंतर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

मराठी on ladki bahin yojana  : GST 2.0 उद्या म्हणजेच 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. जीएसटी परिषदेनं 22 सप्टेंबरपासून 12 टक्के आणि 28 टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं घरातील किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, ऑटोमोबाईलसह आणखी वस्तू स्वस्त होतील. जीएसटी रिफॉर्म्सनुसार 375 वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी होणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. GST बाबत घेतलेला निर्णय हा सर्वांना मोठा दिलासा देणारा आहे. हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे, एक प्रकारे दिवाळी गिफ्ट आणि दिवाळी धमाका आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे लाडक्या बहिणी अजून खुश होणार असल्याचे शिंदे म्हणाले.

सर्वसामान्य मध्यमवर्ग दुकानदार आणि छोटे दुकानदार यांना देखील लाभ होणार

अतिशय चांगला जीएसटी कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे. पूर्वी जीएसटी ते चार स्लॅब होतं मात्र आता पाच टक्के आणि अठरा टक्के असं दोन स्लॅब ठेवले आहेत. यामध्ये जीवनविषयक वस्तूंना प्राधान्य दिला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अजून खुश होणार आहेत. यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्ग दुकानदार आणि छोटे दुकानदार यांना देखील लाभ होणार आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन वाढेल उत्पादन वाढेल आणि रोजगार वाढेल. स्वदेशीच्या नारा स्वदेशीच्या निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. जीएसटीच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. गोरगरीब सर्वसामान मध्यमवर्गी दुकानदार छोटे व्यापारी यांना बुस्ट मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. उद्यापासून लागू होणार आहे, उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे घटस्थापना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी देशवासीयांसाठी देशाच्या प्रगतीसाठी देश आर्थिक महाशक्ती बनण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

जीएसटीचे स्लॅब 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि  28 टक्क्यांवरुन कमी करुन 5 आणि 18 टक्के  ठेवले

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटीचे स्लॅब 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि  28 टक्क्यांवरुन कमी करुन 5 आणि 18 टक्के  ठेवले आहेत. याशिवाय सिगारेट, तंबाखू, दारु यासारख्या गोष्टी 40 टक्के जीएसटीत आणलेत. वित्तमंत्री नि्र्मला सीतारामण यांनी जीएसटी सुधारणांचा निर्णय सामान्य आणि मध्यमवर्गाला दिलासा देणारा आहे.  नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जीएसटी सुधारणांची घोषणा केली होती.

आणखी वाचा

Comments are closed.