गावातील तरुणीशी केली फेसबुकवरुन मैत्री; भेटायला गेल्यावर दिलं गुंगीचं औषध देऊन अत्याचार, भंडारा


भंडारा: भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर मैत्री झाल्यानंतर गुंगीचं औषध देत तरुणीवर दोघांनी मिळून अत्याचार केल्याची (Bhandara Crime News) संतापजनक घटना भंडाऱ्यात घडली आहे. ही घटना भंडाऱ्यात घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. 22 वर्षीय पीडिता आणि आरोपी हे तिघेही भंडारा शहरालगत असलेल्या एका गावातील आहेत. आरोपी तरुण हे दोघेही मित्र असून त्यांनी पीडिताला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. (Bhandara Crime News) त्यानंतर 20 सप्टेंबरला आरोपींनी पीडितेला गुंगीचं औषध (Bhandara Crime News) दिलं. यानंतर तिला तिच्या घरी पोहोचवून देण्याच्या बहाण्यानं गावालगत असलेल्या कॅनल मार्गावरील निर्जनस्थळी नेत एकानं बळजबरीनं अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्यानं तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर तरुणीनं दोघांच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घर गाठलं. यानंतर भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांना आता अटक केली आहे. प्रज्वल पांडे (27) आणि मोहित बांते (29) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचं नावं आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये कारसमोर लघुशंका केल्यावरून वाद अन्..

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कुटीवर आलेल्या तिघांनी दोघांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. गोळी काचेवर लागल्याने अनर्थ टाळला आहे, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जेवण करून मित्रासोबत बाहेर पडल्यानंतर कारसमोर एकाने लघुशंका केली. यातून वाद होऊन शाब्दिक चकमक झाली. काही अंतरावर जाऊन बोलत थांबलेल्या दोन मित्रांवर स्कुटीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला. प्रसंगावधान राखत दोघे कार घेऊन पुढे निघाल्याने गोळी कारच्या काचेवर लागली. यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना कलाग्राम ते प्रोझोन मॉल मार्गावर घडली. याप्रकरणी वाळुज येथील  प्लॉटिंग व्यावसायिक तोफिक शफिक पठाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात तिघां विरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी वाद कशामुळे झाला? गोळीबार करणाऱ्यांचा उद्देश काय होता? याचा तपास एम.सिडको पोलीस करीत आहे.

Akola Crime News: अकोल्यातल्या पातूर शहरात 2 गटात वाद

अकोल्यातल्या पातूर शहरात 2 गटात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री 9 वाजताच्या सुमारास पातूर शहरातल्या बादशाह चौकात राडा झाला होता. अवैध जुगार अड्डयाच्या व्यवसायाच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले. या राड्यात चार जणांवर चाकू हल्ले झाले असून यामध्ये एक जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर पातुर पोलीस घटनास्थळी दाखल त्यासह अकोल्यातून दंगा नियंत्रण पथक, आरसीपीची तुकडी घटनास्थळी दाखल करण्यात आली आहे. सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता पोलिसांकडून संशयित व्यक्तींची धरपकड सुरू आहे. एका व्यक्तीला एका लाखाचा मटका लागला, ते संपूर्ण पैसे न दिल्यामुळे राडा झाला असल्याचे प्राथमिक कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.