सोन्याच्या दरात पुन्हा उसळी! जळगावच्या सुवर्णनगरीत 10 ग्रॅम सोनं 1500 नं वाढलं, किती झालाय भाव


आज सोन्याचे दर: सोन्याचा दर दिवसागणिक विक्रमी उंची गाठत असल्याचे सध्या चित्र आहे .  सोमवारी पुन्हा एकदा उसळी घेत सोन्याच्या भावाने 1500 ते 2000 रुपयांची उसळी मारली असून जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे .जीएसटी शिवाय सोन्याचा दर एक लाख 12 हजार रुपयांवर पोहोचला असून जीएसटीसह हा दर तब्बल एक लाख 16 हजार रुपये झाला आहे .सोन्या चांदीच्या भावात होणाऱ्या सततच्या वाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडले असून अनेकांच्या खरेदी योजनांवर विरजण पडले आहे .

सोन्याच्या दरवाढीमागचे प्रमुख कारण काय ?

आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचा व्यावसायिकांनी स्पष्ट केला आहे .अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदरात केलेली कपात तसेच  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणामुळे निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता ही सोन्याच्या दरवाढीमागची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत . या घडामोडींमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळले आहेत .

सोन्याचा कुठे काय भाव ?

बेलियन असोसिएशनचा प्रिय, मुंबईत आज दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख 13 हजार रुपये एवढा झाला आहे .तर चांदीचा भाव किलोमागे एक लाख 33 हजार 660 रुपये झालाय . हा 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे .22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना एक लाख 3 हजार 583 रुपये प्रति दहा ग्रॅम भाव असून तोळ्यामागे हा भाव एक लाख 20 हजार 818 एवढा आहे .

सोन्याचे दर आणखी वाढण्याचा अंदाज

हाऊस ऑफ ज्वेल बाय बाफनाज ते संचालक सुनील बाफना म्हणाले, “गेल्या 24 तासात सोन्याचा भाव आता जवळजवळ दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण फेडरल बँक ने कमी केलेले व्याजदर. तसेच अमेरिकेच्या टॅरिफ करांमुळे आलेली अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे गुंतवणूकदार सोन्याच्या खरेदीला पसंती देत आहेत .आज सोनं जीएसटीसकट 1 लाख 16 हजार रुपयांवर  गेलं आहे .तर जीएसटी शिवाय एक लाख 12 हजार रुपयांवर सोनं गेलंय .” ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता दिसते आहे, सरकारची धोरणं ठरतात त्यावरून येत्या काळात सोन्याचे भाव वाढतील अशी शक्यता ज्वेलर्स वर्तवत आहेत.

सोनं खूप महाग झालं आहे . हा भाव सर्वसामान्यांना न परवडणारा आहे . नवरात्री निमित्त अनेक जण सोनं चांदी खरेदीला पसंती देतात . पण सोन्याचे दर कमी व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे .

आणखी वाचा

Comments are closed.