रोज ढगफुटीसारखा पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या; विजय वडेट्टीवारांची माग
विजय वाडेटीवार: गेल्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाने (heavy Rain) थैमान घातले आहे. यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकांचं मोठं नुकसान (Crop Damage) झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी एबीपी माझाशी बोलताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत (Diwali 2025) मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, जवळपास 34 लाख हेक्टर शेत जमीन उद्ध्वस्त झालेली आहे. निवडणुकीपूर्वीचा जीआर प्रमाणे देणार, नव्याने जीआर काढून हात आखडता घेणार? शेतात काहीच पिक शिल्लक राहिलेले नाही. एक रुपया पिक विमाचं सोंग करण्याचं काम सरकारने केलं. नंतर शेतकऱ्यांना पैसे भरायला लावले, ही अतिवृष्टी पिक विमाच्या कक्षेत बसतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काय मिळणार? मात्र शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला पैसे दिलेले आहे. इतका नतभ्रष्टपणा आम्ही पाहिलेला नाही, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.
हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची तयारी ठेवा (Vijay Wadettiwar on Crop Damage)
सरकार शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत करणार, याबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची तयारी ठेवा. ढगफुटीसारखा पाऊस रोज पडतोय. 16 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. असे झाले तर महाराष्ट्राचा शेतकरी वाचणार नाही. सर्व काम गुंडाळून तो कुठे राहणार आहे? दोन हेक्टरपर्यंत 13 हजार रुपये मदत देणार, असे म्हणतात पण त्याने काहीच होणार नाही. त्यामुळे हेक्टरी 50 हजार रुपये मदत दिली पाहिजे. पूर्ण नुकसान भरपाई कोणीच देऊ शकत नाही. आम्हाला कळतं पण कर्जमाफी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकार शेतकऱ्यांना योग्य ती मदत करेल : दत्तात्रय भरणे
दरम्यान, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, 65 लाख हेक्टर शेती पाण्याखाली आहे. सोमवारपर्यंतची ही आकडेवारी होती. आज त्यात भर पडली असेल. आम्ही अहवाल तयार केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समोर आज मंत्रिमंडळ बैठकीत तो अहवाल आम्ही मांडू. सरकार शेतकऱ्यांना नक्कीच योग्य ती मदत करेल. पंचनामे तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. ज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यात थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.