2100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा, सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश; मंत
महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॅबिनेट निर्णय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (23 सप्टेंबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी (Farmer) बाधित शेतकऱ्यांना 1 हजार 339 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Goverment) आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यभर 70 लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झालंय. यासाठी 2100 कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याचे आदेश आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले.
सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करण्याचे आदेश- (All ministers ordered to conduct drought tours)
मराठवाडा (Marathwada Rain) सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय. इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालं. धाराशीव, बीडजालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं. तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आलीय. मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला आहे. सरासरी 604 मिमी 22 सप्टेंबरपर्यंत पाऊस होत असतो मात्र 747 मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा 165 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. याबाबतही आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. उद्यापासून सर्व मंत्र्यांनी दुष्काळी दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार- देवेंद्र फडणवीस (help farmers immediately- Devendra Fadnavis)
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील तशी तातडीने मदत दिली जाईल. संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही. आतापर्यंत राज्य सरकारने 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. खरडून गेलेल्या जमिनींसाठी मदत करण्यासाठी जे निकष आहेत, त्यामध्ये बदल करावेत, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. राज्य सरकार त्याविषयी सकारात्मक विचार करत आहे. केंद्र सरकारकडून मदत येण्यासाठी वेळ लागेल. कारण सगळे मूल्यमापन करुन एकच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जातो, नंतर मदत येते. मात्र, केंद्र सरकारने आपल्याला एनडीआरएफतंर्गत अगोदरच पैसे दिलेले असतात. ते पैसे आपण खर्च कररतो. केंद्र सरकार निश्चितच मदत करेल, पण तोपर्यंत राज्य सरकार थांबणार नाही. आम्ही शक्य ती तातडीची मदत शेतकऱ्यांना करुन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करा- देवेंद्र फडणवीस, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=k_otyl1kphs
संबधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.