लक्ष्मण हाकेंच्या विश्वासू अन् जवळच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये हल्ला; जेवायला थांबल्यानंतर 40 जणांन
बीड : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग लावल्याच्या घटनेनंतर काही तासातच बीड जिल्ह्यात (Beed Crime News) आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके (laxman hake) यांचे निकटवर्तीय सहकारी पवन कंवर यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (laxman hake) यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे पवन कंवर (Pawan Kanwar) व त्यांच्या तीन साथीदारांवर तालुक्यातील सावरगावजवळ जेवण करत असतानाच 40 ते 50 अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. यात पतन कंवर हे गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचे साथीदार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Beed Crime News: अज्ञात 40 ते 50 युवकांनी येऊन काठ्या व लाथाबुक्क्यांनी या चौघांना मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे केरवाडी पालम येथील रहिवासी पवन कंवर व त्यांचे तीन साथीदार काल (मंगळवारी, ता 23) संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावरगावजवळ एका धाब्यावर जेवण करत होते. याच वेळी अज्ञात 40 ते 50 युवकांनी येऊन काठ्या व लाथाबुक्क्यांनी या चौघांना मारहाण केली. या घटनेत पवन कंवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे, तर त्यांच्या साथीदारांनाही मार लागला आहे. याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालक कोळी यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी या चौघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत.
Navnath Waghmare Car: नवनाथ वाघमारेंची कार जाळणारा पोलिसांच्या ताब्यात
दोन दिवसापूर्वी नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कार्पिओ डिझेल टाकून जाळल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला. तपासाअंती पोलिसांनी विश्वंभर तिरुखे याला अटक केली. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची गाडी जाळणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विश्वंभर तिरुखे असं त्याचं नाव असून तो मनोज जरांगे यांचा जवळचा सहकारी असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीच्या मागे मनोज जरांगे असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली. दरम्यान, विश्वंभर तिरुखे याने त्याच्यावरील आरोप कबुल केले आहेत. सोमवारपासून फरार असलेल्या विश्वंभर तिरुखे याला अंबड चौफुली येथे जालना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी तिरुखे याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.
आणखी वाचा
Comments are closed.