शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नुकसान भरपाईचे पैसे लगेच मिळवण्यासाठी ‘हे’ काम लगेच करा
महाराष्ट्र पाऊस शेतकरी पिकांचे नुकसान: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या या शेतकरी (Farmers) कुटुंबांनी सर्वस्व गमावले आहे. त्यामुळे हे शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, यंदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पीकविम्याचे (Crops Insurance Scheme) पैसे मिळू शकणार नाहीत. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पीक विम्याच्या नव्या नियमानुसार या अतिवृष्टीतून (Heavy Rain) पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत. नव्या नियमानुसार, कापणीअंतीच पीक विम्याचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आता एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे करुन त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित 721 कोटी रुपयांचा निधी येत्या एक-दोन दिवसांत प्राप्त होईल. ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्याचा अहवाल शासन दरबारी जमा झाला आहे. या महिन्यातील पंचनामे पाऊस ओसरला की पुढील आठ दिवसांत पूर्ण करु. जुलै महिन्यापर्यंतचा निधी आपल्याला मिळाला आहे, ऑगस्टचा काही निधी बाकी असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित या घटकांचा समावेश होता. यासाठी पूर्वी 30 टक्क्यांची मर्यादा होती. आता केवळ उत्पादन आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे व मर्यादा 50 टक्के आहे( तंत्रज्ञान व पीक कापणी.) पूर्वीच्या योजनेत आजच्या अतिवृष्टीसाठी कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळाली असती पण आता जुना नियम नसल्याने ती मिळणार नाही.
Rain crop loss compensation: नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे?
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच जमा होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे, त्यांनी नोंदीप्रमाणे ई-केवायसी करुन घ्यावे. जेणेकरुन नुकसानभरपाईची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकारकडून आलेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आमची एक टीम तालुका पातळीवर कार्यरत आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले असेल तर नुकसान भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=meo7qgsw1va
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.