चार बहिणींचा एकुलता एक भाऊ; ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीपोटी खचला, शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला


परभणी: ओबीसी आरक्षण (OBC reservation) गेलं असं मी समाजात ऐकत या होतो त्यामुळे माझी मनस्थिती बरोबर राहिली नव्हती. माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू होता. आमच्या तरुण बांधवांचे खुप मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी माझ्या ओबीसी समाजासाठी माझे जीवन संपवून टाकत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवत एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या (Parbhani Crime News) केल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यात घडली आहे. एकुलता एक असलेला तरुण गेल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. (Parbhani Crime News)

Parbhani Crime News: कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, त्याला ४ बहिणी

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे येथील २२ वर्षीय कुमार नारायण आघाव या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. यावेळी त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्या चिठ्ठीमध्ये ओबीसी आरक्षण गेल्यामुळे तो तणावात होता. सतत त्याच्या डोक्यात तोच विचार सुरू होता आणि आमच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले असल्याचेही त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. जिंतूरच्या बोरी पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुमार आघाव हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, त्याला ४ बहिणी आहेत. त्यामुळे आघाव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटुंबियाना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

Parbhani Crime News: शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला

घटनेची माहिती मिळताच गजानन माणिकराव दराडे यांनी बोरी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. आडगाव दराडे येथील मेव्हणा कुमार नारायणराव आघाव (२२) परभणीहून गावाकडे जातो म्हणून २३ सप्टेंबरला गावाकडे निघाला. घरी आल्यानंतर आईला शेताकडे जातो असे म्हणून गेला तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला असता शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासणी केली असता कुमार आघावच्या खिशात चिठ्ठी आढळली. यात मी ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीपोटी आत्महत्या करीत आहे, असे लिहिलेले होते असे सांगितले. याप्रकरणी बोरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून तपास पोलिस करीत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.