शिक्षणावेळी ओळख; संबंधांमध्ये वाद नंतर बिनसलं, जुगनू हॉटेलमध्ये भेटीदरम्यान तीव्र भांडण, तरूणील


खामगाव: खामगाव येथील जुगनू हॉटेलमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत साखरखेर्डा येथील तरुण व सिंदखेड राजा तालुक्यातील एका गावातील तरुणीच्या पार्थिवावर (Buldhana Crime News) काल (बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी) अंत्यसंस्कार करण्यात आले. साहिल उर्फ सोनू राजपूत या मुलाच्या पार्थिवावर साखरखेर्डा येथे तर मुलीच्या पार्थिवावर तिच्या गावी अंत्यसंस्कार पोलिस बंदोबस्तात पार पडले. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणीची ओळख शिक्षणाच्या काळात झाली होती. पुढे त्यांच्यातील संबंधांमध्ये वाद वाढल्याने २३ सप्टेंबर रोजी खामगावातील हॉटेलमध्ये भेटीदरम्यान तीव्र (Buldhana Crime News) भांडण झालं. या वादातून तरुणाने अत्यंत टोकाचा निर्णय घेत दोघांचा जीव घेतल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे.

या घटनेनंतर खामगाव पोलिसांनी तातडीने पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. २४ सप्टेंबर रोजी शवविच्छेदनानंतर दुपारी चार वाजता साखरखेर्डा येथे तरुणाचा अंत्यसंस्कार करण्यात आला. तर मुलीचा तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Buldhana Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, खामगावच्या हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले त्यावेळी त्यांच्यात वाद झाला, त्यानंतर त्याने तिच्यावरती वार करून संपवलं, त्यानंतर स्वतःवरती वार करून जीवन संपवलं असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या (Buldhana Crime News) केली. खामगाव शहरातील हॉटेल जुगनूमधील या थरारक हत्याकांडाने शहर हादरलं आहे.(Buldhana Crime News)

Buldhana Crime News: साखरखेर्डा येथील प्रेमीयुगोलाने रूम भाड्याने घेतली

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बायपास परिसरात असलेल्या हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी, ता २३ सायंकाळी जिल्ह्यातीलच साखरखेर्डा येथील प्रेमीयुगोलाने रूम भाड्याने घेतली. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीची भोसकून हत्या केली व त्यानंतर स्वतःलाही चाकूने सपासप वार करत संपवलं. सोनू राजपूत व पायल पवार असं या प्रेमीयुगोलाचे नाव असून दोघेही साखरखेर्डा गावातील होते. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. यावेळी खामगाव शहरात माहिती पसरतात मोठा जमाव या हॉटेल परिसरात जमला होता. यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य बळाचा वापरही करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही तीन ते चार वर्षापासून प्रेम संबंधात होते.

Buldhana Crime News: चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही

याप्रकरणी मिळालेल्या आधिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. या घटनेत दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उजेडात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये २१ वर्षीय युवती व सोनू उर्फ साहिल राजपूत (२३, दोघेही रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच साहिलने हॉटेलात युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करत त्याने जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला.

आणखी वाचा

Comments are closed.