अहो, 1500 अन् 2100 रुपये सोडा, बिहारमध्ये लाडक्या बहिणींना 10 हजार मिळणार, नेमकी काय योजना?
लाडकी बहिन योजना: महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) लोकप्रिय ठरली असताना, आता बिहार सरकारने (Bihar Government) महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना'(Mukhyamantri Mahila Rojgar Yojana) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या उपक्रमाद्वारे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या आर्थिक सहाय्याचा पहिला हफ्ता आज (26 सप्टेंबर 2025) त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
PM मोदी आणि नितीश कुमार यांचा विशेष संवाद (पंतप्रधान मार्ग आणि नितीष कुमार)
या कार्यक्रमानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांचा महिलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये महिला थेट हा संवाद ऐकू शकतील. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा मुख्य हेतू म्हणजे राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना दीर्घकालीन रोजगार निर्माण करण्यास मदत करणे, हा आहे.
1 कोटी 11 लाख महिलांनी केला अर्ज (Bihar Mukhyamantri Mahila Rojgar Yojana)
या योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 11 लाख महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी, पात्र ठरलेल्या 75 लाख महिलांना पहिल्या टप्प्यात आर्थिक मदतीचा लाभ देण्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
10 हजारानंतर मिळणार 2 लाख रुपयांची अतिरिक्त मदत (Bihar Mukhyamantri Mahila Rojgar Yojana)
या योजनेचा उद्देश फक्त तात्पुरती मदत देण्यापुरता मर्यादित नाही. पहिल्या हफ्त्यानंतर, महिलांनी रोजगारासाठी घेतलेली पुढील पावले, त्यांची तयारी आणि उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर 2 लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. या मदतीचा उपयोग महिला शेती, पशुपालन, शिलाई मशीन खरेदी, किंवा इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी करू शकतील. यामुळे महिलांना आपल्या पायावर उभं राहता येईल.
अर्जाची प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष (Bihar Mukhyamantri Mahila Rojgar Yojana)
या योजनेत सहभागी होण्यासाठी काही आवश्यक निकष निश्चित करण्यात आले आहेत. लाभार्थी महिलेने जीविका स्वयं सहायता समुहासोबत जोडलं जावं. या समूहला जोडल्यानंतरच महिला मुख्यमंत्री महिला रोजगार योजनासाठी अर्ज करु शकणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क असणार आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी सरकार किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.