डोंबिवलीत शिंदे गटाच्या नेत्यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप, शरद पवार गटाचा नेता संशयाच्


Dombivli Crime: डोंबिवलीतून (Dombivli) एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महेश पाटील (Mahesh Patil), पदाधिकारी सुजित नलावडे (Sujit Nalawade) आणि महेश पाटील (Mahesh Patil) यांच्या मुलाची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते वंडार पाटील (Vandar Patil) यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात वंडार पाटील आणि मुज्जमिल बुबेरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. (Dombivli Crime News)

या प्रकरणाचा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील आणि सुजित नलावडे यांनी केलाय. महेश पाटील यांनी सांगितले की, “माझ्या, सुजित नलावडे यांच्या आणि माझ्या मुलाच्या हत्येची सुपारी वंडार पाटील यांनी मुज्जमिल बुबेरे या इसमाला दिली होती.” ही माहिती अर्जून देशमुख नावाच्या तरुणाने त्यांना दिली. महेश पाटील यांनी पूर्वी अर्जूनच्या बहिणीच्या एका खाजगी प्रकरणात मदत केली होती. त्या मदतीच्या बदल्यात अर्जूननेच हा खून कट उघड केला.

पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप सादर (Dombivli Crime News)

या कटाची एक ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे सादर करण्यात आली आहे, ज्यात कथित संभाषण रेकॉर्ड असल्याचे महेश पाटील यांनी सांगितले. या क्लिपच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

गुन्हा दाखल, पण अद्याप अटक नाही (Dombivli Crime News)

विष्णूनगर पोलीस ठाण्यात वंडार पाटील व मुज्जमिल बुबेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही अद्याप पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. त्यामुळे महेश पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “आमच्या जीवाला धोका असूनही पोलिस कारवाई करीत नाहीत. सुपारी दिल्याचे स्पष्ट पुरावे असूनही अटक का होत नाही?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

वंडार पाटील यांचे स्पष्टीकरण (Vandar Patil Reaction)

दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वंडार पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, “माझा या प्रकाराशी काहीही संबंध नाही. हे सर्व राजकीय कटकारस्थान आहे. माझ्या मुलाच्या हत्या प्रकरणात महेश पाटील निर्दोष सुटले आहेत. आम्ही या निकालाविरोधात अपील करू नये म्हणूनच आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय.”

नेमकी पार्श्वभूमी काय? (Dombivli Crime News)

2007 मध्ये वंडार पाटील यांच्या मुलाची हत्या झाली होती. या प्रकरणात महेश पाटील यांच्यासह 13 जण आरोपी होते. हा खटला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता आणि काही आठवड्यांपूर्वी त्याचा निकाल लागला. न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत शिक्षा दिली, तर महेश पाटील यांच्यासह उर्वरित दहा आरोपींना निर्दोष मुक्त केले.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; पोलीस बंदोबस्तात कलेक्टरांकडून ‘देऊळ कार्यालय बंद’

आणखी वाचा

Comments are closed.