बँकेच्या कर्जाचा ओझं पत्नीने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; पत्नीवर अंत्यसंस्कार उरकून त्याच वि
फुलंब्री : तालुक्यातील आळंद येथे धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीचे अंत्यसंस्कार उरकून पतीनेही त्याच विहिरीपासून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) अवघ्या पाच फूट अंतरावर जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने कर्जबाजारीपणामुळे हाच टोकाचा निर्णय घेत असल्याचा संदेश व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता. मृत पतीचे नाव विलास रामभाऊ जमधडे (वय ४३, रा. आळंद) असे आहे.कर्जाच्या ओझ्यामुळे पत्नीने व आपणही आत्महत्या करत असल्याचे जमधडे यांनी व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटले.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)
Sambhajinagar Crime News: विहिरीच्या जवळच लिंबाच्या झाडाला गळफास लावून
विलास जमधडे हे शुक्रवारी गावी गेले होते , त्याच दिवशी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर त्यांची मुलं व नातेवाईक घरी गेले. त्यानंतर पती विलास जमधडे यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात जाऊन त्यांनी मोबाइलवर व्हॉट्सअॅप ग्रुपवर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असल्याची पोस्ट केली आणि पत्नीने आत्महत्या केलेल्या विहिरीजवळील झाडाला गळफास घेतला. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी व दोन अविवाहित मुले आहेत.
Sambhajinagar Crime News: जमधडे यांचा व्हॉट्सअॅप मेसेज; सांगितली शेवटची इच्छा
जमधडे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप वरून ग्रुपवर मेसेज केला आहे, मी विलास रामभाऊ जमधडे, माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या बायकोने पण काल बँकेचे कर्ज असल्यामुळे आत्महत्या केली. सुमित, अमित मला माफ करा, पण माझी शेवटची इच्छा तुम्ही आळंद येथूनच शिक्षण पूर्ण करा. माझी प्रिय मुले, असं त्यांनी त्यांच्या मेसेजमध्ये लिहलं आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
Sambhajinagar Crime News: दोघांवरतीही होतं कर्ज
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावावर अवघी ४३ गुंठे जमीन होती. शेतीतून पुरेसा उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नीसमवेत मजुरी करून उदरनिर्वाह भागवत होते. मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी तसेच खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. पत्नी रमाबाई यांच्यावरदेखील बचत गटाचे कर्ज असल्याचे समोर आले आहे.
Sambhajinagar Crime News: पोस्ट वाचून ग्रामस्थांनी धाव घेतली, पण…
जमधडे यांनी केलेली पोस्ट वाचताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र शेत गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असल्याने तेथे पोहोचण्यास वेळ लागला. तोपर्यंत जमधडे यांनी गळफास घेतला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर वडोद बाजार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी तो फुलंब्री उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
आणखी वाचा
Comments are closed.