भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवणार नाही, ठाकरेंच्या दणक्यानंतर PVRची माघार


मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधानंतर पीव्हीआर सिनेमाने (पीव्हीआर सिनेमा) एक पाऊल मागे घेतलं आहे. आशिया कपमध्ये होणाऱ्या भारत आणि पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग (भारत वि पाकिस्तान थेट प्रवाह) करणार नसल्याचं पीव्हीआरकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील पीव्हीआर सिनेमागृहात हा सामना दाखवण्यात येणार नाही.

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला, पहलगाममध्ये निरपराध 26 जणांचा जीव घेतला. त्यामुळे पाकिस्तानसोबत सामना खेळणे, किंवा तो दाखवणे हा देशद्रोह आहे अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली होती. पीव्हीआर सिनेमाला त्यांनी इशाराही दिला होता. त्यानंतर पीव्हीआरने या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

शिव सेनेने आयएनडी वि पीएके सामन्याला विरोध केला: ठाकरे गटाचा विरोध

शनिवारी एक ट्वीट करत पीव्हीआरने देशभरात भारत आणि पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी देशभरात 100 हून जास्त स्क्रिन्सचे नियोजन केल्याचंही सांगण्यात आलं होतं. पीव्हीआरच्या या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला.

पीव्हीआर वर संजय राऊत ट्विट: देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊतांची मागणी

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियातून निशाणा साधला. देशद्रोहाच्या आरोपाखाली पीव्हीआरवाल्यांना अटक करा. भारत पाकिस्तान सामना खेळणे, खेळवणे, दाखवणे, पाहाणे, हा पहलगाममधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे, देशद्रोह आहे. क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही. पीव्हीआर, तुमच्याकडे हिंदुतवादी जनतेचे लक्ष्य आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी इशारा दिला होता.

शिवसेना ठाकरे गटाचा विरोध लक्षात घेता आता पीव्हीआरने आपला निर्णय बदलला आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग महाराष्ट्रात दाखवण्यात येणार नाही असं पीव्हीआरने स्पष्ट केलं. या संबंधी पीव्हीआरचे प्रोग्रामिंग आणि ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस डिसोझा यांनी शिवसेनेशी संपर्क साधत हा निर्णय कळवल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी माध्यमांना दिली.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.