वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो; शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन महे
Mumbai shivsena UBT Dasra melava : वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो .आमचा मेळावा शिवतीर्थावरच होणार आणि त्याची तयारी सुरू झाली आहे असं वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत (mahesh Sawant) यांनी केलं आहे . येत्या तीन दिवसांमध्ये दोन्ही शिवसेनेच्या दसरा मिळावी नियोजित आहेत . भाजपने मुंबईतील दसरा मेळावा रद्द करून ते पैसे ठाकरे गटाने पूरग्रस्तांना द्यावेत अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्याबद्दल वक्तव्य केलं आहे .
Dasara Melava 2025:काय म्हणाले महेश सावंत ?
सावंत यांनी सांगितलं की,’विभाग प्रमुखांची बैठक झाली आम्हाला जबाबदारी दिली आहे .बाहेरून माणसे येणार आहेत त्यांची व्यवस्था करावी लागणार आहे .सगळी व्यवस्था करत आहोत .”सीमेवर सैनिक लढाताना काही बघत नाही. वारा -वादळ काही बघितलं जातं नाही .प्रमुखाने आदेश दिला आहे की शिवतीर्थावरच मेळावा घ्यायचा त्यानुसार आम्ही तयारी सुरू केली आहे . वाघ जंगलात मैदानात फिरतात बंदिस्त ठिकाणी फिरत नाहीत त्यामुळे आमचा मेळावा शिवतीर्थावरच होणार आणि त्याची तयारी जय्यत सुरू झाली आहे
जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता, ठाकरे गटाचे उत्तर
मुंबईमध्ये जे अॅड्स मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लावण्यत आल्या त्याचा खर्च तुम्ही पूरग्रस्तांना द्यायला हव्या होता अजूनही जर काही पैसे राहिले असतील तर ते पूरग्रस्तांना जाहिरातीचे द्या . दसरा मेळावा करणे ही आमची परंपरा आहे आणि आमची मदत पूरग्रस्तांना सुरू आहे मला सुद्धा अनेक फोन येत आहेत त्यानुसार आम्ही जी हवी ती मदत कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे देत आहोत
संदीप देशपांडे मोठे नेते आहेत त्याच्यावर तेच बोलतील…मी त्याच्यावर काय बोलणार आम्हाला फक्त एवढेच वाटतं की ठाकरे ब्रँड मुंबईत राहिला पाहिजे . शिंदे सेना म्हणत असेल महापूर त्यांचा होणार तर प्रत्येक पक्षाला वाटतं की महापौर आपला झाला पाहिजे . असं ही उबाठा गटाचे महेश सावंत म्हणाले .
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा
* 30 ऑक्टोबर 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावर पहिला दसरा मेळावा घेतला
* मागील 59 वर्षापासून शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवतीर्थ एक समीकरण बनलं आहे
* दसरा मेळाव्याच्या 59 वर्षाच्या परंपरेत आतापर्यंत फक्त एकदा दसरा मेळावा हा रद्द करण्यात आला
* शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोनवेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे.
* 2006 साली मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. शिवाजी पार्कवर चिखल झाला होता काही ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता.
* 2009 साली विधानसभा निवडणुका लागल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात दसरा मेळावा घेणं शक्य नव्हतं तेव्हा तो पुढे ढकलण्यात आला होता.
* तर 2020 आणि 2021 या दोन वर्षी कोरोनाचा संकट होतं आणि त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या ठिकाणी बंदिस्त सभागृहात हा मेळावा झाला
* तर 2022 साली शिवसेनेत झालेल्या पक्ष फुटी नंतर मागील तीन वर्षापासून दोन शिवसेनेचे दसरा मेळावे होत आहेत
आणखी वाचा
Comments are closed.