बाल सुधारगृहातून पळाला, लघुशंकेवरून वाद झाल्यानं एकाला संपवलं, नाशिकमधील अल्पवयीन मुलाचा रक्तरं


नाशिक गुन्हा: नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाल सुधारगृहातून पळून गेलेल्या एका अल्पवयीन मुलाने पुन्हा एकदा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलाने मुंबई नाका (Mumbai Naka) परिसरात लघुशंका करू नको, असे सांगितल्याच्या रागातून बंडू गांगुर्डे या फिरस्ती इसमाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी (Police) संबंधित मुलाला ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime News)

विशेष म्हणजे, या अल्पवयीन मुलाने काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे एका इसमाचा खून केला होता. मैत्रीची छेड का काढली, या क्षुल्लक कारणावरून त्याने ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात एका इसमाचा खून केला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन प्रक्रियेनंतर मनमाड येथील बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तो तेथून पळून गेला होता. सुधारगृहातून पलायन केल्यानंतर त्याने पुन्हा दुसऱ्यांदा खून केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

हत्या कशी घडली? (Nashik Crime News)

दोन दिवसांपूर्वी मुंबई नाका परिसरात बंडू गांगुर्डे (35) या इसमाने येथे लघुशंका करू नकोस, अशी बतावणी अल्पवयीन मुलाला केली. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि अल्पवयीन मुलाने धारदार चाकूने बंडूवर हल्ला चढवला. छाती व पोटावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान बंडू गांगुर्डे या मजुराचा मृत्यू झाला.

पोलिसांची कारवाई (Nashik Crime News)

गुन्हा घडल्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फॉरेन्सिक पथक आणि तपास विभागासोबत तपास सुरू केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अल्पवयीन असूनही या मुलाकडून सलग दोन हत्या झाल्यामुळे नाशिकमधील पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बाल सुधारगृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Crime : पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् किरकोळ वाद विकोपाला; संतापात पतीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं; नवी मुंबईतील करावे गाव हादरलं!

Nashik Crime News : तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली, फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं अन् शरीरसुखाची मागणी; पिस्तुलाचा धाक दाखवत पैसेही लुटले!

आणखी वाचा

Comments are closed.