‘स्टुडंट ऑफ द इयर’ फेम अभिनेत्याच्या बॅगेत 35 कोटींचं कोकेन; एअरपोर्टवरच ठोकल्या बेड्या


स्टुडंट ऑफ द इयर फेम अभिनेता ड्रग्सच्या प्रकरणात अटक: बॉलीवूड आणि ड्रग्स हे कनेक्शन अनेक वेळा समोर आलं आहे.  नुकतच ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटात काम केलेल्या एका सहकलाकाराला चेन्नई एअरपोर्टवर ड्रग तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली. (Drugs Trafficking)  या अभिनेत्याकडून पोलिसांनी 3.5 किलो कोकेन जप्त केलं आहे. या ड्रग्स ची किंमत अंदाजे 35 कोटी असल्याची प्राथमिक माहिती आहे . नुकताच सिंगापूर मधून परत येत होता तेव्हा त्याला कस्टम आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या संयुक्त पथकाने रोखलं . त्याच्या ट्रॉली बॅगच्या एका सीक्रेट डब्यात कोकेन लपवल्याचं आढळलं .

या अभिनेत्याचं नाव अजून उघड झालेलं नाही . बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये लहानसहान भूमिका करणाऱ्या या सहकलाकाराला विमानतळावर थांबवण्यात आलं .त्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी 3.5 किलोच्या अंमली पदार्थासह त्याला पकडण्यात आले .(Crime News)

नेमके घडले काय?

विशेष गुप्त माहितीच्या आधारे कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने या अभिनेत्याला रविवारी पहाटे सिंगापूरहून चेन्नईत दाखल होताच थांबवले. तपासणीदरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगच्या खालच्या गुप्त कप्प्यात प्लास्टिक पिशव्यांत पांढऱ्या रंगाचे पावडरसदृश्य पदार्थ आढळले. प्राथमिक चाचणीत ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.

अधिकाऱ्यांनी अभिनेत्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली असता तो कंबोडियाहून सिंगापूरमार्गे चेन्नईला आला असल्याचे उघड झाले. त्याने सांगितले की, कंबोडियामध्ये काही अनोळखी लोकांनी त्याला ही ट्रॉली दिली होती व ती चेन्नई विमानतळावर एका व्यक्तीकडे सुपूर्द करायची होती. मात्र, तपास यंत्रणांना शंका आहे की, हे कोकेन मुंबई किंवा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलकडे पोहोचवण्याचा त्याचा हेतू होता. DRI या संपूर्ण जाळ्याचा शोध घेत असून कस्टम्स विभाग त्याच्या प्रवासाच्या नोंदींची चौकशी करत आहे, जेणेकरून याआधीही त्याने अशा प्रकारे अंमली पदार्थांची तस्करी केली आहे का याचा उलगडा होऊ शकेल.

दरम्यान, मागील दोन आठवड्यांत चेन्नई विमानतळावर कोकेनची ही दुसरी मोठी पकड आहे. 16 सप्टेंबर रोजी इथिओपियाहून आलेल्या केनियाच्या नागरिकाकडून 2 किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. तर 1 सप्टेंबर रोजी चेन्नई कस्टम्सने 5.6 किलो कोकेन फेरेरो रोशेर चॉकलेटच्या डब्यांत लपवून आणणाऱ्या दोन प्रवाशांना अटक केली होती.

हेही वाचा

Actor Sarang Sathaye Married With Girlfriend: Love Will Always Win! अखेर 12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पॉला आणि सारंगनं उडवला लग्नाचा बार

आणखी वाचा

Comments are closed.