मिरारोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंडं फेकलं, पोलिसांच्यादेखत जोरदार राडा, नागरिक संतप्त


मीरा रोड: मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान (Garba) मोठा वाद निर्माण झाला होता. गरबा सुरु असतानाच एका व्यक्तीने अंडे फेकल्याच्या प्रकरणी एस्टेला बिल्डिंगच्या एका रहिवासी व्यक्तीच्या विरोधात काशिमिरा पोलिसांनी (Police) बी.एन.एस. 2023 कलम 300 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(Crime News)

Crime News: महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ अंडे फुटले

काल (३० सप्टेंबर रोजी) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सोसायटीत गरबा कार्यक्रम सुरू असताना,  एस्टेला बिल्डिंगमधील एक रहिवासी व्यक्ती हातात मोबाईल घेऊन त्याठिकाणी आला. त्याने डेसिबल लेव्हल तपासले तसेच गरबा खेळणाऱ्या लोकांचे व्हिडिओ काढून ते पोलिसांना दाखवत होता. यापूर्वी देखील त्याने अनेक वेळा पोलिसांना फोन करून कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केलेला होता.यानंतर रात्री १०.५० वाजता एस्टेला बिल्डिंगच्या १६व्या मजल्यावरून त्या व्यक्तीने खाली काहीतरी फेकले, अशी माहिती एका नागरिकाने दिली. काही वेळातच दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ अंडे फुटलेल्या अवस्थेत आढळले. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.

Crime News: धार्मिक उपासना सुरू असताना जमावास व्यत्यय आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद

या कृत्यामागे तोच व्यक्ती असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला. त्याच्या विरोधात शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे तसेच विविध हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या आणि पोलिस ठाण्यात धाव घेतली. नागरिकांच्या दबावानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरुद्ध धार्मिक उपासना सुरू असताना जमावास व्यत्यय आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सध्या त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्याचे ठरवले आहे. दरम्यान, त्या व्यक्तीने यापूर्वीही बकरी ईदच्या निमित्ताने झालेल्या वादामुळे रहिवाशांशी सतत वाद घातले असल्याचे समोर आले आहे.

Crime News: सोळाव्या मजल्यावरून समाजकंटकाने अंडी फेकली

याबाबत शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांंनी म्हटलं की, भाईंदर शहरामध्ये खूप निंदनीय प्रकार झाला आहे. मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत हा निंदनीय प्रकार झाला आहे. आज राज्यभर नवरात्र उत्सव साजरा होत आहे. त्याचबरोबर मीरा-भाईंदर शहरांमध्ये, मुंबई असू द्या सर्व ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होत आहे. प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये लोकं साजरा करत आहेत. पण आज मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत खाली गरबा सुरू असताना सोळाव्या मजल्यावरून समाजकंटकाने अंडी फेकली. ही गोष्ट मला काही लोकांनी फोनवरून सांगितली. इथल्या स्थानिकांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन केले सरनाईक यांचा मला फोन आला. त्यांनी आम्हाला सांगितलं तिथे जावा आणि पहा काय झालं आणि मला परिस्थिती सांगा काय आहे. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा पाहिलं तर खाली अंड्याचे कवच खाली पडले होते. समाजकंटकाने गरबा खेळत असताना विशेष म्हणजे जिथे पोलीस होते, पोलीस बंदोबस्त असतानाही त्यांनी हा प्रकार केला आहे. त्यानंतर मी पोलिसांना, वरिष्ठांना फोन केला. जे काही घडलं आहे ते पोलिसांच्या समोर घडले आहे. त्यांच्यावरती कारवाई करा, जोपर्यंत कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक इथून हालणार नाही असे आम्ही त्यांना सांगितलं. चार साडेचार वाजता त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.