पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पुन्हा कोथरूडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न; पिस्तूल अन् हत्यार CCTV


पुणे: शिक्षणाचं माहेरघर अन् सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नक्की काय चाललंय? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. शहरात कधी गाड्यांची तोडफोड होते, तर कधी हातात शस्त्र (Pune Crime News) घेऊन थेट सोसायटीमध्ये शिरणाऱ्या गुंडांची दहशत सहन करावी लागते. कोथरूडसारख्या (Pune Crime News) भागातही नागरिक आता सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार प्रकरणी पोलिस कारवाई करत असतानाच आता आणखी एक घटना याच भागातून समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या एका इमारतीत २ गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली घटना….

विशेष म्हणजे कुठलाही धाक न बाळगता या गुंडांनी चक्क सीसीटिव्हीमध्ये पिस्तूल आणि हत्यार दाखवली त्याचबरोबर परिसरात  दहशत माजवली आहे. नेमकं कुठल्या उद्देशाने हे दोन गुंड या सोसायटीमध्ये शिरले होते याचा तपास सुरू आहे.  हा सगळा प्रकार काल (मंगळवारी) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या गुंडांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे.

Pune Crime News: कोथरूड परिसरात घायवळ टोळीकडून गोळीबार अन् कोयत्याने वार

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीने धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले होते. कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात पहिल्यांदा ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर दुचाकीला जाण्यासाठी वाट दिली नसल्याच्या कारणातून गोळीबार करण्यात आला. यावेळी ते गंभीर जखमी झाले होते, त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने  (Pune Crime News) वार करून हल्ला करण्यात आला. एका रात्री दोन रक्तरंजित कृत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली होती. या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील सदस्यांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत, आरोपींनी “आम्हीच इथले भाई” असा दहशतीचा आव आणत हे हल्ले केल्याचे समोर आले. केवळ गाडीला साईड न दिल्याच्या कारणावरून धुमाळ यांच्यावर गोळीबार झाला, तर सागर साठे यांच्यावर कोणतेही कारण नसताना फक्त दहशत पसरवण्यासाठी कोयत्याने वार करण्यात आला. मागील काही दिवसांपासून शांत असलेली घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत त्यांना अटक केली. (Pune Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.