निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याविषयी धक्कादायक माहिती, बलात्कार प्रकरणात अटक अन
पुणे: पुण्यातून युरोपला पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट (Nilesh Ghaywal passport case) मिळवण्यासाठी बनावट माहितीचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्याने बनावट नाव आणि बनावट पत्त्याचा उपयोग करून पासपोर्ट मिळवला, ज्यामुळे पासपोर्ट (Nilesh Ghaywal passport case) कार्यालयातील अधिकारी आणि नगरमधील कोतवाली पोलिसांच्या कृत्यांविरोधात संशय निर्माण झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, निलेश घायवळने ज्या नगरमधील पत्त्याचा वापर केला होता, त्या पत्त्यावर तो वास्तव्यात राहत नसल्याची माहिती समोर आली. तरीसुद्धा, त्याला तात्काळ पासपोर्ट जारी करण्यात आला. या पासपोर्टाचा वापर करून घायवळने युरोपच्या टूरसाठी नव्वद दिवसांचा व्हिजा मिळवला आणि तो युरोपमध्ये पसार झाला. हा प्रकरण उघडकीस आल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर आणि नगर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या प्रकरणाच्या तपासणीसाठी संबंधित विभाग अधिक तपास करीत आहेत. घायवळच्या बनावट माहितीचा वापर करण्याच्या मागे कोणत्याही प्रकारची सहकार्य असण्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.(Nilesh Ghaywal passport case)
Vikas Wagh arrest: विकास वाघलाच एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल अटक
पुण्यातील गुडं निलेश घायवळला नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातून संशयास्पद पद्धतीने पासपोर्ट मिळाला त्यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यात विकास वाघ नावाचा पोलीस निरिक्षक तैनात होता हे आता समोर आलं आहे. विशेष म्हणजे पोलीस निरिक्षक विकास वाघलाच एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल अटक झाली. त्यामुळे घायवळच्या पासपोर्टसाठी काय काय घडलं असावं याची चर्चा सुरु झाली आहे. निलेश घायवळ ने तात्काळ पासपोर्ट मिळावा यासाठी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड ४१४००१ हा पत्ता त्याने दिला पत्ता दिला होता. या पत्यावर घायवळ आढळून आला नाही किंवा त्याच्याशी संपर्क देखील होऊ शकला नाही असा अहवाल कोतवाली पोलीसांनी त्यावेळी पासपोर्ट कार्यालयाला दिला होता. कारण असा कोणता पत्ता अस्तीत्वातच नाही. मग घायवळचा पासपोर्ट कोणत्या पत्त्यावर आणि कोणाकडे पाठवण्यात आला हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
DCP Sambhaji Kadam: पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली माहिती
पुण्यातील गॅंगस्टर निलेश घायवळ विदेशात फरार आहे. निलेश घायवळने पासपोर्ट कसा मिळवला याचा तपास सुरू आहे. पुणे पोलिसांचे पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहे. पुण्यातील कुख्यात गॅंगस्टर निलेश घायवळ सध्या विदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात मोठा धक्कादायक खुलासा म्हणजे घायवळ याने खोटा पत्ता आणि कागदपत्रं सादर करून पासपोर्ट मिळवला असल्याचा समोर आला आहे.
यासाठी पुणे पोलिसांचं पथक अहिल्यानगर येथे दाखवलेल्या पत्त्यावर पोहोचलं असून, पासपोर्ट ऑफिसशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. निलेश घायवळला पासपोर्ट मिळवण्यासाठी कोणाची मदत झाली का, याचा तपास देखील सुरू आहे.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी घायवळच्या घरावर पोलिसांनी कारवाई करत चार गाड्या जप्त केल्या. यामध्ये एका दुचाकीवर बनावट नंबर प्लेट आढळून आली असून याप्रकरणी देखील घायवळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त एवढंच नाही तर, घायवळ टोळीतील इतर साथीदारांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विशेष पथक रवाना करण्यात आली आहेत.
Nilesh Ghaywal: गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही
सामान्यांना पासपोर्ट देताना कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करणाऱ्या पासपोर्ट कार्यालयाला आणि नगर पोलिसांना गुंड निलेश घायवळचे कॅरेक्टर मात्र खटकले नाही. घायवळवर हत्य, अपहरण, खंडणी, शस्त्रांचा वापर असे अनेक गंभीर गुन्हे नोंद असताना देखील पासपोर्ट मिळवण्यात घायवळ यशस्वी ठरला. पासपोर्टसाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यलयाकडे घायवळने २३ डिसेंबर २०१९ला अर्ज केला. मात्र आर्जवर पुण्यातील नाही तर अहिल्यानगरचा गौरी घुमटानंदी बाजार , कोतवाली , माळीवाडा रोड ४१४००१ हा पत्ता त्याने दिला.
Nilesh Ghaywal: नॉट अव्हेलेबल एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यलयाला कळवला
नगरच्या कोतवाली पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या पत्त्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्यांना घायवळ आढळून आला नाही . त्याचबरोबर त्याच्याशी संपर्क देखील होऊ शकला नाही. कारण मुळात असा कोणता पत्त्ता अस्तित्वातच नाही. मात्र कोतवाली पोलिसांनी हा पत्ताच बनावट आहे असं पासपोर्ट कार्यलयाला न कळवता नरो वा कुंजरोवा भूमिका घेत नॉट अव्हेलेबल एवढाच अभिप्राय पासपोर्ट कार्यलयाला कळवला. त्याआधारे १६ जानेवारी २०२०ला घायवळला पासपोर्ट कार्यालयाकडून तात्काळ स्वरूपाचा पासपोर्ट देण्यात आला.
Nilesh Ghaywal: नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं
हा पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने नाव देखील बनावट वापरलं. त्यासाठी आडनावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केला. Ghaywal या नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं. आश्चर्य म्हणजे पुढील पाच वर्षे याचा पोलिसांना आणि पासपोर्ट कार्यालयाला थांगपत्ता देखील लागला नाही .
Nilesh Ghaywal: त्याचा पासपोर्ट जमा केला नाही
२०२१ मधे निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्यावर्षी म्हणजे २०२२ मधे घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मीळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळ ने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलीसांनी देखील जमा करुन घेतला नाही. हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हीजा मिळवून युरोपला फीरायला गेला.
https://www.youtube.com/watch?v=F9WPAZ3W3Y0
आणखी वाचा
Comments are closed.