देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी माझे कान पकडू देत, तो त्यांचा अधिकार पण…; गोपीचंद पडळकरां


सांगली: गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील (Jayant Patil) विरुद्ध गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) असा संघर्ष रंगतो आहे. पडळकर यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) संस्कृती बचाव मोर्चा काढला. त्यानंतर भाजपने पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थनार्थ आंदोलने उभारली. कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्यात पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यातच बुधवारी भाजपकडून विकृतीचा रावण दहन आणि इशारा सभा घेण्यात आल्याने वाद आणखी चिघळला. सततच्या आरोप-प्रत्यारोपामुळे वाद संपण्याऐवजी तीव्र होत चालल्याचे चित्र दिसत असून ऐन नवरात्रीतच राजकीय वातावरण रंगत असल्याने “हा संघर्ष नेमका कधी थांबणार?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगलीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Gopichand Padalkar : म्हणून मी त्यांना बिरोबा बनातून झोडून काढलं

याआधी केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊन देखील गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या चुकीच्या भाषेचे समर्थन केले आहे, सांगलीमध्ये झालेल्या सभेत पडळकर यांनी स्वतःच्या चुकीच्या भाषेचा समर्थन केलं आणि म्हणाले, 18 तारखेला मी जतमध्ये जे काही बोललो त्यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला त्यांनी मला सक्त सूचना दिल्या, त्यांनी मला परत असं परत बोलायचे नाही अशा सूचना दिली, याचा खुलासा मी मीडियासमोर केला आहे. चंद्रकांत पाटील यांचाही फोन आला, मी त्यांनाही सांगितलं की मी पुढे असे बोलणार नाही. 22 तारखेला महाराष्ट्र संस्कृती बचाव असा मोर्चा काढला. माझ्यावर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करता इथपर्यंत ठीक होतं, परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीवर खालच्या पातळीवर टीका केली, म्हणून मी त्यांना बिरोबा बनातून झोडून काढलं, असंही पुढे पडळकरांनी म्हटलं आहे.

Gopichand Padalkar : तेव्हा शरद पवारांनी फडणवीसांना  फोन का नाही केला?

नरेंद्र मोदी यांच्या आईचा एआय-जनरेटेड व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हा शरद पवारांनी फडणवीसांना  फोन का नाही केला असा सवाल यावेळी पडळकरांनी उपस्थित केला आहे. 346 जाती असणाऱ्या ओबीसींसाठी फडणवीस सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं. अहिल्यादेवींची जयंती साजरी करावी यासाठी आम्ही आंदोलने करत होतो, पण या जातीयवादी अवलादीने चार ओळींचे पत्रक काढणे शक्य झाले नाही. ते फडणवीस आणि मोदींनी करून दाखवलं. संपूर्ण देशभर अहिल्यादेवींची  जयंती साजरी झाली. पुढचा नेता कोण होणार हे भाजपला माहीत नसतं. नरेंद्र मोदी आले तेव्हा माहित नव्हतं की हेच पंतप्रधान होणार आहेच. त्याच्यानंतर पंतप्रधान कोण होईल हे देखील पक्षाला माहित नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यावर खालच्या पातळीवर बोलाल तर याद राखा, गोपीचंद पडळकर त्याच भाषेत तुम्हाला उत्तर देईल. आम्ही गावाकडे खेळ खेळत असताना पोर आई बहिणी वरून आम्हाला शिव्या देतच होती, असंही पुढे पडळकरांनी म्हटलं आहे.

Gopichand Padalkar :  फडणवीस, चंद्रकांत पाटील माझे कान पकडू देत तो त्यांचा अधिकार पण…

पुढे बोलताना पडळकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीला विरोध करू शकता पण संपूर्ण ब्राह्मण समाजाला तुम्ही कशा शिव्या देऊ शकता, ही तुमची कुठली संस्कृती आणि संस्कार आहेत. ब्राह्मण समाजाला शिव्या देणे हे कदापि खपवून घेणार नाही. गोपीचंद पडळकर बोलले की त्यांची जीभ घसरली असे म्हणतात. मग मला शिव्या घातल्या त्याच्यावर का महाराष्ट्रात चर्चा झाली नाही. तुम्ही मला अरे म्हटलं तर मी कारे म्हणणार…मला एक कानाखाली माराल तर मी दोन कानाखाली मारेल. तुम्ही टीका केला तर मी टीका करणारच मग मला संस्कृतीचं काही देणंघेणं नाही. रोहित पवारांना त्यांच्या काटेवाडी गावामध्ये बिरोबाचे मंदिर आहे हेच माहीत नाही. मला आता बिरोबांने सांगितले मस्तवाल लोकांना आणून काप… हा मला बिरोबाने दिलेला आदेश आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी माझे कान पकडू देत तो त्यांचा अधिकार आहे, पण राष्ट्रवादीवाला मला आरे, कारे केला तर ते मी कदापी खपवून घेणार नाही, त्याचबरोबर जयंत पाटलांना भाजपमध्ये घेऊ नका अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी भाषणातून चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=jaaxmpvn9ok

आणखी वाचा

Comments are closed.