धनंजय मुंडे शेरोशायरीने मनातलं सगळं बोलून गेले; पंकजा मुंडेही पाहत बसल्या, VIDEO


Dhananjay Munde Dasara Melava बीड: बीडच्या सावरगाव घाट येथे मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava) सुरु आहे. पंकजा मुंडे सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यानंतर पंकजा मुंडेंनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, पूजा व आरती केली. पंकजा मुंडेंच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) देखील उपस्थित आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

आज शेतकरी अडचणीत आहे, इथे आलेला प्रत्येकजण शेतकरी आहे, आज मी मंत्रीमंडळात नाही, फक्त आमदार आहे. माझी बहिण मंत्रीमंडळात आहे, शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पंकजा मुंडेंनी मिळून दिल्याशिवाय राहणार नाही, असं धनंजय मुंडेंनी सांगितले. दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आलेत, त्यांना मेळावा कधी सुरू झाला, मेळावा कुणी सुरू केला काही माहिती नाही. भगवान गडाच उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना दसऱ्याच्या दिवशी सुरू केलं.  त्या दिवसापासून या दसऱ्याची परंपरा आहे, आजही डोळ्यात पाणी येत की, स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला, असं धनंजय मुंडेंनी सांगितले.

माझ्या बहिणींचा अभिमान वाटतो- धनंजय मुंडे (Dhananjay Munde In Beed)

आजच्या पंकजाताईंनी सुरू केलेल्या दसऱ्या अभुतपूर्व गर्दी आज झाली आहे. पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषणात उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा आजपर्यंतचा सर्वात अभूतपूर्व मेळावा कोणता असेल तर तो आजचा मेळावा आहे. आपण एवढ प्रेम मुंडे कुटूंबावर दाखवलं नतमस्तक होऊन प्रणाम करतो. पाऊस आला, पूर आला भयंकर शेतकऱ्यांसमोर संकट आलं, तसलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली आपण काय करावं, असं धनंजय मुंडे म्हणाले. मला माझ्या बहिणींचा अभिमान वाटतो, साहेब गेल्यानंतर सुध्दा असंख्य अडचणीत सुध्दा पंकजाताईंनी सार्थ परंपरा पुढे ठेवली. मी देवाण-घेवाण बघत असताना पुढे आलो, मागे बघितलं, मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेकजण मागे दिसतात. त्यांना वाटत पुढे निवडणूका नाहीत. काहीजण म्हणले, मुंडे साहेबांच सगळं संपलं, असं म्हणत मैने सोचा की इस सफर करते हूए खामोश रहाना सही हैं…कुछ भी नहीं करता बहोत गालीयां खाई हैं, असं धनंजय मुंडे म्हणाले.

आपण मराठा समुदायाचा राजीनामा म्हणून आनंद- धनंजय मुंडेचा पुन्हा अभ्यास करूया

ज्या ज्या आरक्षणाचा मुद्दा आला मी प्रत्येकवेळी मी भांडलो. मराठा समाजाला आरक्षण दिलं कारण आम्हाला आनंद आहे, कारण त्या चळवळीत होतो. काही जणांना मराठा आरक्षणाच्या मागून, ओबीसींच आरक्षण घ्यायचं आहे. ओबीसींच कटऑफ 485 आणि स्पेशल विकर सेशनचा कट ऑफ 450 मार्क आहेत. मी जर मराठा समाज म्हणून ईडब्लूसच आरक्षण घेतलं, तर पास झालो असतो. प्रमाणपत्र घेवून 480 मार्क घेऊन सुध्दा नापास, कुणाला फसवताय तुम्ही…काही ठरावीक लोक खुर्ची मिळावी म्हणून, राजकारण करायचं…, असं धनंजय मुंडे म्हणाले. जेव्हा माझ्याविरोधात मीडिया ट्रायल होती, त्यावेळी माझी बहिण मला आधार देत होती. माझ्या पक्षातील महायुतीच्या नेत्यांनी, माझ्या विरोधात घोटाळा काढला. कोर्टातून मला क्लिनचीट दिली, जो कोर्टात गेला त्याला 1 लाखाचा दंड ठोठावला, असंही धनंजय मुंडेंनी सांगितले. दसरा मेळाव्यात मी एवढच सांगतोय की ना आम्ही कुणाला विरोध केला, ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत. हा शिक्षणाशी जोडले गेलेला समाज आहे, आज जे बीड जिल्ह्यात जाती पातीचे, जिगरी दोस्तांची दोस्ती तुटली. हे वातावरण आपल्याला मोडायचं आहे, जाती पातीचा द्वेष आपल्याला काढायचा आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडेंच्या शायरीने वेधलं लक्ष- (Dhananjay Munde Shayari)

धनंजय मुंडेन्नी आजचाया भाषण यमाध्यायला आग लागली होती, माझ्या घरा, सर्व विचारणा करणारे लोक आले आणि गेले … एका खर्‍या मित्राने विचारले की काय शिल्लक आहे? मी फक्त काहीही सोडले नाही… मग त्याने एका मित्राला मिठी मारली … मग जळजळ म्हणजे काय?

https://www.youtube.com/watch?v=R97L_FHFGU0

आणखी वाचा

Comments are closed.