मराठा समाजाला आरक्षण दिलं, आम्हाला आनंद, पण…; धनंजय मुंडेंचा भगवान गडावरुन एल्गार, काय काय म्
Dhananjay Munde Dasara Melava बीड: बीडच्या सावरगाव घाट येथे मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडत आहे. पंकजा मुंडेंच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) देखील उपस्थित आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आरक्षणाबाबतही आपली भूमिका व्यक्त केली.
Dhananjay Munde: प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता
मेळाव्यामध्ये बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, अनेक जणांना ऐकायचंय कारण मी बरेच दिवस झाले बोललोच नाही. मैने सोचा की इस सफर मे खामोश रहना है ठीक है, बिना कुछ किये हमने गालियां खाई है. मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या-ज्या वेळी ज्या-ज्या जातींच्या आरक्षणाचा मुद्दा आला, त्या-त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. हे सगळं तुमच्यापासून लपलेलं नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, आम्हाला आनंद आहे. कारण आम्ही त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत देखील होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आडून ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे, असं धनंजय मुंडे म्हणालेत.
Dhananjay Munde: मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंद…
पुढे ते म्हणाले, इडब्ल्यूएस इकॉनोमिक विकर सेक्शन, एक उदाहरण सांगतो, ज्या ज्या आरक्षणाचा मुद्दा आला मी प्रत्येकवेळी मी भांडलो. मराठा समाजाला आरक्षण दिलं कारण आम्हाला आनंद आहे, कारण त्या चळवळीत होतो. काही जणांना मराठा आरक्षणाच्या मागून, ओबीसींच आरक्षण घ्यायचं आहे. ओबीसींच कटऑफ 485 आणि स्पेशल विकर सेशनचा कट ऑफ 450 मार्क आहेत. मी जर मराठा समाज म्हणून ईडब्लूसच आरक्षण घेतलं, तर पास झालो असतो. प्रमाणपत्र घेवून 480 मार्क घेऊन सुध्दा नापास, कुणाला फसवताय तुम्ही…काही ठरावीक लोक खुर्ची मिळावी म्हणून, राजकारण करायचं…. तर मराठा समाजातील लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारने जे करायचं ते केलं आहे, अजूनही करत आहेत. पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपू शकत नाही, तसं आम्हालाही सांगावसं वाटतं आरक्षण दिलं आहे, आणखी द्या, आमचं काही म्हणणं नाही. पण, आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात करू नका, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Dhananjay Munde:कोर्टातून मला क्लिनचीट दिली…
जेव्हा माझ्याविरोधात मीडिया ट्रायल होती, त्यावेळी माझी बहिण मला आधार देत होती. माझ्या पक्षातील महायुतीच्या नेत्यांनी, माझ्या विरोधात घोटाळा काढला. कोर्टातून मला क्लिनचीट दिली, जो कोर्टात गेला त्याला 1 लाखाचा दंड ठोठावला, असंही धनंजय मुंडेंनी सांगितले. दसरा मेळाव्यात मी एवढच सांगतोय की ना आम्ही कुणाला विरोध केला, ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत. हा शिक्षणाशी जोडले गेलेला समाज आहे, आज जे बीड जिल्ह्यात जाती पातीचे, जिगरी दोस्तांची दोस्ती तुटली. हे वातावरण आपल्याला मोडायचं आहे, जाती पातीचा द्वेष आपल्याला काढायचा आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=1jue3elth90
आणखी वाचा
Comments are closed.