भारत-पाकच्या सामन्याआधी पुन्हा राडा; पाकिस्तानची माजी कर्णधार पाकव्याप्त काश्मीरबाबत नको नको ते


आझाद काश्मीरवर सना मीर विवादास्पद टिप्पणीः आशिया कप 2025 दरम्यान भारत-पाकिस्तान (India VS Pakistan Asia Cup 2025) सामन्यात मैदानात भरपूर वाद झाले. पाकिस्तानी खेळाडूंपासून त्यांच्या क्रिकेट बोर्डापर्यंत सगळ्यांनीच नको तो ड्रामा केला. मात्र हा वाद आशिया कप 2025 पुरताच थांबला नाही. आता आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 (Women’s ODI World Cup 2025) मधील पाकिस्तान-बांगलादेश (Bangladesh vs Pakistan) सामन्यात पाकिस्तानच्या माजी महिला कर्णधार सना मीर (Sana Mir)यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे.

सना मीर हिच्या “आजाद काश्मीर” या विधानावरून वाद पेटला (Sana Mir Controversial Comment )

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात सना मीर (Sana Mir Controversial Comment)समालोचन करत होत्या. पाकिस्तानची फलंदाज नतालिया परवेज मैदानात आल्यावर तिने तिच्या मूळगावीचा उल्लेख करताना ती आझाद काश्मीर मधून आली आहे असे म्हटली. तसेच क्रिकेटसाठी तिला लाहोरला यावे लागते असेही सांगितले. तिच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आयसीसीने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. यावर सना मीर हिने स्पष्टीकरण दिले आहे.

पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीर काय म्हणाली?

सना मीर म्हणाली की, “काही गोष्टींचं जास्तच विकृतीकरण केलं जात आहे आणि खेळातल्या लोकांवर अनावश्यक दडपण टाकलं जातंय, ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे. या गोष्टीसाठी मला स्पष्टीकरण द्यावं लागतंय, हेही खूप खेदजनक आहे.”

पुढे ती म्हणाली की, “मी पाकिस्तानच्या एका खेळाडूच्या गावाबद्दल केलेली टिप्पणी केवळ तिच्या प्रवासातील आव्हानं आणि तिने त्या प्रदेशातून येऊन केलेल्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकण्यासाठी होती. आम्ही कमेंट्री करताना नेहमी खेळाडू कुठून आलेत, त्यांच्या प्रवासाची कहाणी काय आहे, हे सांगतो. आज मी इतर दोन खेळाडूंविषयीही त्यांचं मूळस्थान सांगितलं होतं. कृपया याला राजकीय रंग देऊ नका.”

“कमेंटेटर म्हणून आमचं लक्ष केवळ खेळ, संघ आणि खेळाडूंवर असतं, आणि त्यात त्यांच्या चिकाटी व प्रेरणादायी प्रवासाच्या गोष्टी मांडल्या जातात. माझा कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतूही नव्हता. मी ज्या स्त्रोतांमधून खेळाडूंविषयी माहिती घेत असते, त्याचा स्क्रीनशॉटही मी जोडत आहे. त्यांनी ती माहिती आता बदललेली आहे, पण मी त्याचाच संदर्भ घेतला होता, असे पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीर म्हणाली.(ICC Womens World Cup 2025 Match Sana Mir Controversial Comment On Azad Kashmir)

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमांनुसार कोणताही खेळाडू, अधिकृत सदस्य किंवा सामना व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती सामना सुरू असताना किंवा त्याच्या संदर्भात राजकीय वक्तव्य करू शकत नाही. सना मीर हिने काश्मीरला “आझाद काश्मीर” म्हणत नियमभंग केला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई होण्याची शकता आहे.

हे ही वाचा –

India Vs Pakistan : पाकिस्तानच्या नापाक कुरापती, महिला विश्वचषकात ‘आझाद काश्मीर’ म्हणत भारताला डिवचलं; भारतीय चाहत्यांकडून टीकेची झोड

आणखी वाचा

Comments are closed.