एसटी बसच्या पासवरून वाद चिघळला; महिला वाहकानं चक्क विद्यार्थिनीचे केस खेचले; व्हिडिओ व्हायरल
भंडारा बातम्या : शालेय विद्यार्थिनींना एसटी महामंडळाच्या बसनं प्रवास करण्याकरिता मोफत पास दिला जातो. मात्र, याची मुदत संपल्यानंतर प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीला महिला बस वाहकानं (ST Conductor) पासबाबत विचारल्यानंतर धावत्या बसमध्येचं वाहक आणि विद्यार्थिनींमध्ये (School Girl) वाद निर्माण झाला. दरम्यान, हा वाद विकोपाला गेल्यानं विद्यार्थिनींनं वाहकाच्या हातातील तिकीट कापण्याची मशीन पळविण्याचा प्रयत्न केला. तर, तिला पकडण्यासाठी महिला वाहकानं विद्यार्थिनीच्या डोक्याचे केस पकडून तिला पकडून ठेवलं. या वादात विद्यार्थिनीच्या डोक्याची प्रचंड वेदना झाल्यानं ती ओक्साबोक्षी रडायला लागली. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या सूरेवाडा बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी घडला. यात ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीत केलेला व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रकरणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल (ST Conductor and School Girl Dispute Video Goes Viral)
दरम्यानग्रामस्थांनी या घटनेनंतर ही बस सूरेवाडा बस स्थानकावर अडवून धरत कारधा पोलिसात तक्रार दाखल करण्याकरिता नेली. तिथं एकमेकांच्या विरोधात तक्रार दिली. मात्र, त्यानंतर प्रकरण समोपचारानं मिटविण्यात आलं. भंडारा आगाराची ही बस भंडारा येथून करडी मार्गे तिरोडाकडं निघाली होती. या दरम्यान हि कार्यक्रम घडलीय? सध्या या प्रकरणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरएल होत असून संताप व्यक्त केला जात आहे?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला धारदार शस्त्राने वार करून जागेवर संपवलं
छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार गुन्हेगारी (Chhatrapati Sambhajinagar Crime) घटना समोर येत असून शहरातील सर्वात गजबजलेल्या रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ( 1 ऑक्टोबर ) थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली एका तरुणाला धारदार शस्त्राने वार करून जागेवर संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने घेतला जात आहे. (Crime news)
इमरान शेख हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रिक्षा चालक म्हणून काम करणारा हा तरुण बुधवारी रात्री संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली थांबला होता. त्यावेळी चारचाकीतून आलेल्या दोघांनी त्याला गाठलं. कोयत्याने त्याच्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.