माओवाद मुक्त महाराष्ट्रच्या शक्यतेला जोरदार बळ, वरिष्ठ नक्षल कमांडर प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा


गॅचिरोली नक्षल्यांना बातम्या: काही दिवसांपूर्वी माओवाद्यांच्या (Naxal) सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरो सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने एक पत्रक काढलं होतं? यात माओवाद्यांनी त्वरित आपले शस्त्र खाली ठेवून सरकारसोबत शस्त्रबंदी जाहीर करावी आणि शांतता वार्ता करावी, असा प्रस्ताव मांडला होता. त्याच्या काही दिवसानंतरच माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या इतर सदस्यांच्या वतीने पत्रक काढत प्रस्ताव फेटाळून लावला? तसेच शस्त्रबंदी आणि शांतता वार्ताचा सोनूचा प्रस्ताव त्याचा वैयक्तिक प्रस्ताव असल्याचे सांगत माओवाद्यांच्या संघटनेत सोनू एकटा पडल्याचे संकेत दिले होते.

अशातच आता मात्र माओवाद्यांच्या (Naxalites News) गडचिरोली डिव्हिजनने एकत्रितपणे एक पत्रक काढत मल्लोजुला वेणूगोपाल उर्फ सोनूच्या प्रस्तावाला पूर्ण समर्थन देत प्रस्तावित शस्त्रबंदीला समर्थन दिले आहे. त्यामुळे माओवाद मुक्त महाराष्ट्रची शक्यतेला जोरदार बळ मिळाले आहे. तर माओवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजनसह गडचिरोलीत सक्रिय असलेल्या कंपनी 10चे सदस्य तसेच टेक्निकल टीमने सोनूच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

गडचिरोली डिव्हिजनच्या एकत्रित पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे? (Senior Naxal Commander Fully Supports the Proposal)

-सी.आर. आणि पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड सोनूच्या शस्त्रबंदी आणि शांतता वार्ताच्या प्रस्तावाला गडचिरोली डिव्हिजन कमिटी, गडचिरोली सक्रिय कंपनी 10चे सदस्य आणि टेक्निकल विभाग पूर्ण पाठिंबा देत आहे.

-गेल्या काही काळात माओवाद्यांचा क्रांतिकारक आंदोलन सातत्याने कमकुवत होऊन त्याची पीछेहाट होत आहे.

-देशातील कुठल्याच राज्यात माओवाद्यांचे क्रांतिकारक आंदोलन मजबूत होताना दिसत नाही आहे.

-गेल्या काही काळात माओवाद्यांना सातत्याने होणाऱ्या नुकसानमुळे आमच्यासारख्या खालच्या स्तरावरील कॅडरमध्ये आमच्या नेतृत्व संदर्भात त्यांच्या रणनीती आणि धोरण संदर्भात संशय आणि अविश्वास निर्माण झाला आहे.

-गेल्या काही महिन्यात माओवाद्यांनी जनरल सेक्रेटरी नंबाला केशवरावसह केंद्रीय समितीचे 8 सदस्य तसेच विविध राज्य समितीचे 20 सदस्य सुरक्षा दलासोबतच्या संघर्षात गमावले आहे.

-अनेक दशकात निर्माण झालेले नेतृत्व अशा पद्धतीने नाहीसे होणे माओवाद्यांच्या खालच्या स्तरावरील कॅडर तसेच माओवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या मनोबलाचा खच्चीकरण करणारे आहे.

-माओवाद्यांच्या नेतृत्वाचे सध्याचे धोरण आणि वर्तमान काळातील तरुण पिढी यांचे विचार यात साम्यता नाही, त्यामुळे तरुण पिढी विविध जन आंदोलनामध्ये उतरत असली, तरी सशस्त्र क्रांतिकारी आंदोलनामध्ये (जंगलातील सशस्त्र लढ्यासाठी) उतरण्यास तयार नाही.

-गडचिरोली डिव्हिजनमध्ये मागील काही वर्षात नवीन रिक्रुटमेंट होत नाही आहे. त्यामुळे गडचिरोली डिव्हिजन पूर्णपणे केंद्रीय कमिटीकडून पाठवल्या जाणाऱ्या त्यांच्या रंगरूट केंद्रीय समितीने पाठवलेले माओवादीवर अवलंबित आहे.

-त्यामुळे गडचिरोली डिव्हिजनला एकत्रितपणे असं वाटते की त्वरित शस्त्रबंदी करून संघर्ष टाळण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाही.

-गडचिरोली डिव्हिजनच्या या एकत्रित पत्रकावर गडचिरोली डिव्हिजनचा प्रवक्ता कमलसाय वेलादी याच्यासह गडचिरोली मधील कंपनी 10चा कमांडर निखिल तसेच गडचिरोली डिव्हिजनचा टेक्निकल टीमचा प्रमुख मैनू याच्या स्वाक्षऱ्या आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.