तब्बल 70 किलो चांदीची चोरी, आरोपीला उत्तर प्रदेशातून केली अटक, खडक पोलिसांची मोठी कामगिरी


गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यातील गुरुवार पेठेतील तब्बल 40 वर्षे जुन्या असलेल्या सराफी पेढीवर चोरट्यांनी डल्ला मारुन तब्बल 70 किलो चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी एकाला उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 36 किलो 442 ग्रॅम चांदी जप्त केली आहे. चोरी केलेली चांदी त्याने उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी नेली होती.

चोरट्यांनी तीन पोती भरून 67 लाख 60 हजार रुपये किमतीची 70 किलोहून अधिक दागिन्यांची चोरी केली

गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. राजेश महाराणीदिन सरोज (36, रा. माघी चैनगड, थाना महेशगंज, ता. कुंडाख जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. 14 सप्टेंबर व 15 सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी तीन पोती भरून 67 लाख 60 हजार रुपये किमतीची 70 किलोहून अधिक दागिन्यांची चोरी केली. यात 62 लाखांची चांदी तर 5 लाखांच्या रोकडचा समावेश होता.  या चांदीनी भरलेली पोती (सिमेंटच्या गोणीच्या आकाराची) वाहून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक तपास करण्यात आला. यातील संशयित आरोपींनी गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने उत्तर प्रदेश येथे गेले असल्याचे दिसून आले. अजून काही आरोपींचा शोध खडक पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

भारताच्या स्टार खेळाडूच्या घरी चोरी, कष्टाने कमावलेल्या पदकांसोबत पद्मश्री पुरस्कारही लंपास

आणखी वाचा

Comments are closed.