धक्कादायक! आधी चार महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकलं, नंतर पित्यानं संपवलं जीवन


अंडे: बीडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकून वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील तहत रामनगर येथे उघडकीस आली आहे. अमोल हौसराव सोनवणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने चार महिन्यांच्या बाळाला देखील बॅरलमध्ये टाकून जीवे मारले.

पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत

दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तलवाडा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वीच दोघा पती-पत्नीत कौटुंबिक वाद झाला होता. यातूनच अमोल सोनवणे याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

प्रेमप्रकरणात अपयश, तरुणाने 11 व्या मजल्यावरून उडी मारुन जीव दिला, डोंबिवलीतील घटना मोबाईलमध्ये कैद

आणखी वाचा

Comments are closed.