नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांकडून पोलीस स्थानकावर तुफान दगडफेक


नाशिक गुन्हेगारी बातम्या: नाशिकच्या कळवण मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कळवण येथील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यात आंदोलकांनी पोलीस स्थानकावर (Kalvan Police Station) दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून खून केल्याचा आरोप प्रकरणात संशयितांवर गुन्हा (Crime News) दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान, पोलिस आणि आंदोलकामध्ये झालेल्या शाब्दिक वादातून हि दगडफेक झाल्याचे बोललं जात आहे. अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत (Nashik Crime News) पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्याचे बघायला मिळालं आहे. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Kalvan Tribal Protest: आंदोलकांकडून पोलीस स्थानकावर दगडफेक, पोलिसांसह पत्रकार जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या कळवण पोलीस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने एकच धावपळ उडाली. कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होतं. दरम्यान, पोलीस व आंदोलनकर्त्यामध्ये वाद होऊन त्यातूनच आदिवासी बांधवानी थेट पोलीस स्थानकावरच दगडफेक केल्याने एकच धावपळ उडाली.

दगडफेकीत पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झालेत. तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्या. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Amravati Accident News: ट्रकच्या धडकेत बिबटचा मृत्यू; अमरावती चांदूररेल्वे मार्गावरील घटना

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रोडजवळील SRPF कॅम्पच्या आसपास दुर्दैवी घटना घडली. ट्रकच्या धडकेमुळे एक बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिकांनी वनविभागाला सूचना केली आणि तातडीने पथक दाखल झाले. वनविभागाच्या मते या भागात बिबट्यांची हालचाल वाढलेली असल्याने वाहतुकीसाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.