महायुतीत भडका, 20-25 गाड्यामधून सिनेस्टाईल एंट्री; शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास दम
रायगड : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसविरूद्ध कॉंग्रेस शिंदेंच्या शिवसेना (Shivsena) आमदारांमधील वाद काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी घोषणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली. तसेच, खासदार सुनील तटकरे हे ठाकरे गटाला मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर, आता रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाडमधील शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी महाडमधील राष्ट्रवादीचे (NCP) नेते स्नेहल जगताप यांच्या सहकाऱ्याला दम दिल्याने राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधील राजकारणातील तणाव आणखी चिघळला आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर आमदार महेंद्र दळवी समर्थक संतप्त झाले आहेत. आमदार दळवी यांचे भाचे व युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा 20 ते 25 गाड्यांसह महाड शहरात दाखल झाला. यावेळी देशमुख यांना थेट इशारा देत “राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत” असा इशाराच या कार्यकर्त्यांनी महाडमध्ये जाऊन दिला. दाक्षिणात्य सिनेमाप्रमाणे सिनस्टाईल प्रविष्टी अन् करण्यात आलेल्या दमबाजीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चिघळले असून तणाव पाहायला मिळत आहे.
दरम्यान, याआधीच शिंदे सेनेचे राजा केणी यांनी देखील देशमुखांच्या वक्तव्यावरून त्यांना आव्हान दिले होते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा महायुतीतीलच शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहे.
बंधू महनाले देशमुख (एनसीपी धनंजय देहतमुख महाद) नष्ट करण्यासाठी)
सन 1992 पासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे. सुनील तटकरेंच्या पायाला हात लावून जे मोठे झाले, त्यांनी तटकरे यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा याहीपेक्षा परखड शब्दात उत्तर दिले जातील. हा डोंबाऱ्याचा खेळ थांबवावा, आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही. आम्हाला तुमच्यावर 498 दाखल आहे, त्यावर बोलायचं नाही, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी अलिबागच्या आमदारांनाही इशारा दिला होता. त्यानंतर, महाड येथे जाऊन धनंजय देशमुख यांना दम दिला आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.