जमेल तिथं महायुती आणि जमेल तिथं स्वबळावर लढणार, मंत्री हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य
हसन मुश्रीफ: जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आम्ही एकत्र लढणार आहोत. पण जमेल तिथं महायुती आणि जमेल तिथं स्वबळावर लढणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते.
पदवीधरची जागा ही राष्ट्रवादीचीच, भैय्या माने निवडणूक लढवणार
पदवीधरची जागा ही गेल्या चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी विजयी झाली आहे. ही राष्ट्रवादीची जागा असल्याने ही जागा आमची आहे असा आमचा दावा असल्याचे मुश्रीफ म्हणाले. पण आम्ही सोडलेला अश्वमेध घोडा हा जिंकणारच आहे. मागील वेळी ते कोल्हापूरच्या मतांमध्येच निवडून आले होते, ही संख्या अधिक आहे. तिन्ही पक्षाचे नेते ही जागा कोणाला द्यायचे हे ठरवतील असे मुश्रीफ म्हणाले. भैय्या माने हे आमचे उमेदवार असणार आणि ते विजय होणार हा आमचा संकल्प आहे. काही अधिकारी काम करत नाहीत यामध्ये तथ्य आहे. त्याशिवाय आमचे सहकारी अधिकाऱ्यांना बोलणार नाहीत. जे अधिकारी चांगले काम करत नाहीत त्यांची बदली केली पाहिजे असेही मुश्रीफ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Hasan Mushrif: अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते; हसन मुश्रीफांची खोचक टीका
आणखी वाचा
Comments are closed.