पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात पोलिसांशी हुज्जत घालणं भोवलं; 13 जणांवर कारवाईचा बडगा; नेमकं का
Pankaja Munde Dasara Melava 2025: बीडच्या (Beed) सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्यादरम्यान (Dasara Melava 2025) मोठा गोंधळ घडल्याची समोर आले होते. या पार्श्वभूमीवर विनापरवाना मोटारसायकल रॅली काढणाऱ्या आणि पोलिसांशी (Police) हुज्जत घालणाऱ्या 13 जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर रोजी सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर पार पडला. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. मेळाव्याच्या अनुषंगाने काही स्थानिक तरुणांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या रॅलीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती.
Pankaja Munde Dasara Melava 2025: 13 जणांवर कारवाईचा बडगा
रॅलीला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी संबंधित तरुणांना पार्किंगमध्ये गाड्या पार्क करून मेळाव्यासाठी जाण्याचे सांगितले. मात्र, त्या वेळी काही युवकांनी पोलिसांशी उद्धट वर्तन करत त्यांच्याशी अरेरावी केली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचेही उल्लंघन केले. या प्रकारानंतर अंमळनेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित 13 जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
Pankaja Munde Dasara Melava 2025: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले होते वाल्मिक कराडचे पोस्टर
दरम्यान, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले होते. या पोस्टरवर “We support walmik anna, कराड आमचे दैवत” असा मजकूर झळकत होता, कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकले होते. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आले होते. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावरून पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे. लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मिक कराड यांच्या बाबत काय वाटते? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, Video:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.