‘चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या ‘त्या’ व्यक्तीचा मोबाईल चेक करा, घायवळचे किती फोन, निरोप दादांना


पुणे : परदेशात फरार झालेल्या गुंड नीलेश घायवळच्या (Nilesh Gaywal) प्रकरणाने पुण्यात पुन्हा चर्चेला ऊत दिला आहे. घायवळने (Nilesh Gaywal) पळ काढण्यापूर्वी पासपोर्टवरील नाव बदलल्याचा आरोप आहे. त्याच्या पलायनामागे कोणाचा राजकीय आश्रय आहे का, हा प्रश्न आता जोर धरत आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी धक्कादायक दावा करत म्हटलं आहे की, कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यापर्यंत घायवळकडून थेट संदेश पोहोचत होते.

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : तो चंद्रकांत पाटील यांच काम बघतो

पुण्यातील गँगस्टर नीलेश घायवळ परदेशात फरार झाला आहे. घायवळला कोण मदत करतंय  याप्रकरणी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे, तो चंद्रकांत पाटील यांच काम बघतो, त्याच्या सर्व मोबाईलची आणि नंबरची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे. घायवळ आणि तो किती वेळा बोलला त्याने दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. घायवळ एकटा काही करू शकत नाही पोलिसांनी आज ठरवलं तर घायवळ नेस्तानाबूत होईल. पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी ही पिलावळ वाढवली आहे त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी थेट चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे, दरम्यान धंगेकरांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

Nilesh Gaywal: पासपोर्ट रद्द करण्याच्या हालचाली

कुख्यात गुंड निलेश घायवळचा (Nilesh Ghaywal) पासपोर्ट पुणे पोलीस (Pune Police) रद्द करणार असल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही माहिती दिली आहे. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांची याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा झाल्याची माहिती आहे. निलेश घायवळने(Nilesh Ghaywal) बनावट कागदपत्रे, माहितीच्या आधारे पासपोर्ट  मिळविल्याचं तपासात उघड झाले आहे. घायवळने पासपोर्ट मिळवण्यसाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्र सादर केली. ही कागदपत्रे अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून त्याने तत्काळ पासपोर्ट मिळवला. घायवळ ११ सप्टेंबरपासून परदेशात असल्याची पोलिसांना माहिती आहे. तर निलेश घायवळने (Nilesh Ghaywal)पासपोर्ट काढताना अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात त्याने त्याच्यावर राज्यात कोठेही गुन्हा दाखल नसल्याची खोटी माहिती दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे, घायवळने परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळवला याचा शोध सुरु आहे. (Nilesh Ghaywal)

Nilesh Ghaywal: पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कोथरूड गोळीबार प्रकरणात ‘मकोका’ कारवाई केल्यानंतर परदेशात पसार झालेला गुंड निलेश घायवळचे पासपोर्ट रद्द करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काल (शुक्रवारी, ३) दिली. घायवळने बनावट कागदपत्रे, माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याचे तपासात उघड झाले आहे. पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट विभागातील अधिकाऱ्यांनी काल (शुक्रवारी, ३) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केली. कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ परदेशात पसार झाला. घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून त्याने तत्काळ पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती आहे.

https://www.youtube.com/watch?v=kdodjvbjgfg

आणखी वाचा

Comments are closed.