ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना


गुन्हे बातम्या घाला पुणे: पुण्यातील एक धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. ड्यूटी संपवून घरी जात असताना दोघांनी पोलिसांवर कोयत्याने वार (Attack In Police) केला. पुण्यातील लॉ कॉलेजरोडवर काल (5 ऑक्टोबर) रात्री 1 वाजताच्या सुमारास सदर घटना घडली. त्यामुळे पुण्यात आता पोलीसचं असुरक्षित आहे की काय?, असा प्रश्न उपस्थित होतोय.

नेमकं प्रकरण काय? (Pune Crime News)

ड्यूटी संपवून घरी जात असताना रविवारी रात्री 1 च्या सुमारास लॉ कॉलेजरोडवर बाईक वरुन जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनीट-3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे. या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पुण्यातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर-

पुण्यातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून मायलेकी पैसे न देता चप्पल खरेदी करुन पसार झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील एमजी रोडवरील नामांकित चप्पल दुकानातील घटना घडली. बनावट ओळखपत्र दाखवून, घरात लग्नाचा कार्यक्रम असल्याचं सांगून एमजी रोडवरील एका नामांकित दुकानातून चप्पल खरेदी केल्यानंतर पैसे न देता त्यांनी मायलेकी निघून गेल्या. मिनाज मुर्तजा शेख (वय ४०), रिबा मुर्तजा शेख (वय. १९,) अशी मायलेकींची नावं आहेत. दुकानदाराने दोघींविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी CCTV तपासत दोघींना ठोकल्या बेड्या ठोकल्या. तसेच 45 हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दोघींच्या विरुद्ध यापूर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आरोपी महिला मिनाज आणि तिची मुलगी रिबा या दुकानात आल्या. मिनाज हिने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखविले. त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल व बुट खरेदी करून कामगाराला ‘पैसे देण्यासाठी कमिश्नर ऑफिसला चल’ असे सांगितले. मात्र पैसे न देता तब्बल १७ हजारांचा माल घेऊन दोघी पसार झाल्या. दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर एम. जी. रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींचा ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागला. अखेर 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी दोघींना अटक करण्यात आली.

ही बातमीही वाचा:

पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, मद्यधुंद चालकाच्या कारचा चेंदामेंदा; दुचाकीस्वार जखमी

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Comments are closed.