नाशकात गुन्हेगारीनं टोक गाठलं, भल्या पाहटे कोयत्याने वार करत एकाला संपवले, नागरिकही धास्तावले


नाशिक गुन्हा: नाशिक शहर पुन्हा एकदा हत्येच्या धक्कादायक घटनेने हादरले आहे. पहाटेच्या सुमारास नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात अमोल मेश्राम या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोयत्याने वार करत  एकाला संपवले.  हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस दल तात्काळ दाखल झाले आहेत.  या प्रकरणी तपास सुरू केला आहे. (Crime News)

Nashik Crime: नेमके घडले काय?

नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात पहाटेच्या सुमारास अमोल मेश्राम नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कोयत्याने वार करत ही हत्या केली.  गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीने कळस गाठला आहे. सातत्याने समोर येणारे खून, हाणामाऱ्या, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारच्या घटनांमुळे शहरातील लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नाशिक शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाईची अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये सातत्याने वाढत असलेली गुन्हेगारी आणि भयंकर हत्यांच्या घटनांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे.  काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) हद्दीत थेट कायद्यालाच आव्हान देत शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली.

वादाने टोक गाठलं,  नाशिकमध्ये गोळीबाराची घटना

बिअरबारमध्ये झालेल्या वादातून एकावर थेट गोळी झाडण्यात आली. विजय तिवारी (वय 20) या तरुणाच्या मांडीत गोळी घुसली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना रात्री उशिरा सुरू असलेल्या बिअरबारसमोरच घडली. विशेष म्हणजे, ही घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि पोलिसांच्या डोळ्यासमोर घडल्याने सातपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांचा मुलगा भूषण लोंढे (Bhushan Londhe) याच्यासह आठ ओळखीचे आणि चार अज्ञात अशा एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime :इन्स्टावर ‘दबंगगिरी’ करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका

नाशिक शहरातील वाहतूक बेटांवर, दिशादर्शक फलकांसमवेत मुख्य चौकांत पुन्हा भडकलेल्या बॅनरबाजीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींची ‘चमकोगिरी’ वाढत असल्याच्या निष्कर्षावर पोलीस आयुक्तालयाने ठोस पावले उचलली आहेत. आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहर बॅनरमुक्त करण्यासाठी आदेश दिले असून, यानुसार काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले गेले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.