शिवसेनेचा धनुष्यबाण आम्हाला द्या नाहीतर गोठवा, चंद्रकांत खैरे भावूक, सर्वोच्च न्यायालयाकडे आर्ज


मुंबई: शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह कोणाचं यावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme court) अंतिम सुनावणी होणार आहे. या संदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, पक्ष धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यावं, अन्यथा ते गोठवा, अशी हात जोडून विनंती चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी केली आहे.

पुढे खैरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना Shivsena) स्थापन केली. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यावेळी नारळ फोडला होता आणि नाव दिले. शिवसेना पक्ष त्यानंतर वाढत गेला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 1968 च्या वेळी त्यावेळी धनुष्यबाणाची निशाणी होती. हळूहळू ते वाढत गेलं. लोकसभा, विधानसभेला धनुष्यबाण नव्हता. काही ठिकाणी वेगवेगळे चिन्ह दिले होते. नंतर हा धनुष्यबाण फिक्स झाला. 1988 ला संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक झाली. त्यावेळी हा धनुष्यबाण घेतलेल्या तेव्हापासून मी आतापर्यंत निवडून आलो, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विजयी झालो, हाच धनुष्यबाण इलेक्शन कमिशनने कोणत्या निकषावर शिंदे गटाला दिला त्याचं मला आश्चर्य वाटतं. सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत. त्यांनी शिवसेना फोडली त्यांच्याकडेच ते पक्ष आणि चिन्ह गेलं ते योग्य नाही. (Shivsena)

पुढे बोलताना खैरे म्हणाले की, कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला देखील हे पटत नाही. या लोकसभेच्या निवडणुकीला एक लाख मत माझी धनुष्यबाणाची मला समजून त्या विरोधी पक्षाकडे गेले. अनेकांनी सांगितलं चंद्रकांत खैरे यांना मतदान केलं, चिन्ह कोणतं होतं तर धनुष्यबाण होतं असं सांगत होते, त्यांनी चालबाजी केली, निवडणूक आयोगाने आधी चालबाजी केली. त्यांनी धनुष्यबाण वापराला नाही म्हणाले, त्यानंतर मशालीचा चिन्ह दिले. नंतर त्यांनी सांगितलं अशी मशाल नाही. तशी मशाल आहे. त्यामुळे पंधरा दिवस आधी चिन्ह वेगळं झालं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. खैरेंच्या छातीवर कायम धनुष्यबाण दिसायचा त्यामुळे लोकांनी त्यालाच मतदान केलं.

पुढे खैरे म्हणाले, मी देवाकडे प्रार्थना करेन की आमचा पक्ष चिन्ह आणि शिवसेना आम्हाला परत द्या. आम्ही धनुष्यबाणाची पूजा नेहमीच करत असतो. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीमध्ये धनुष्यबाण अजूनही ठेवलेला आहे आणि आणखी त्याची पूजा केली जाते, मग हा धनुष्यबाण ओरिजनल शिवसेनेला का मिळू नये, हे आमच्या सर्व शिवसैनिकांच्या आणि नागरिकांचे मागणे आहे, सुप्रीम कोर्ट  सर्वांचा आहे. काही बोलता येत नाही. पण सुप्रीम कोर्टाला विनंती आहे. आमचा धनुष्यबाण आम्हाला मिळवून द्या. हीच प्रार्थना करतो, आमचा धनुष्यबाण मिळाला पाहिजे आणि तो आम्हाला मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे. जर नाही मिळाला तर पुढे काय? या प्रश्नावर बोलताना खैरे म्हणाले, ते पक्षप्रमुख ठरवतील परंतु कोणालाच देऊ नये, मग परंतु प्रत्यक्षात तो आम्हाला मिळाला पाहिजे. ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, त्यामुळे आम्हालाच धनुष्यबाण मिळाला पाहिजे अन्यथा तो गोठाला गेला पाहिजे असंही पुढे चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

अरविंद सावंत:अरविंद सावंत काय म्हणाले?

आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पक्षांतर्गत कायदा असूनही त्याची धज्जीया सरन्यायाधीश चंद्रचूड पासून उडवल्या गेली. आता चौथे न्यायाधीश आहे, ज्यांच्या समोर सुनावणी आहे बघू आज प्रकाश किरण उजाडतो का? चंद्रचूड यांनी राज्यपाल यांच्यावर ताशेरे ओढले होते, त्यांचे निर्णय संविधानिक नाही असे बोलले होते. त्यामुळे कोणत्या आधारावर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिलं. ज्या शर्ती घातल्या त्या पूर्ण आम्ही केल्या, तरीही चिन्ह आणि पक्ष त्यांना देताय.त्यांचं सदस्य रद्द व्हायला पाहिजे. कालबद्ध काळात निर्णय द्यायला पाहिजे. देशात लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. सगळ्या संस्था कशा वागताय बघा, असंही शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=Hzfiwqfztfa

आणखी वाचा

Comments are closed.