तहसील कार्यालयात शेतकऱ्यानं जीवन यात्रा संपवली; खासदार धानोरकरांवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप


चंद्रपूर बातम्या: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती (Bhadravathi) तहसील कार्यालयात शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी खळबळजनक आरोप केले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar)  आणि दिवंगत बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे बंधू अनिल धानोरकर यांच्यावर हे आरोप आहेत. दिवंगत बाळू धानोरकर यांच्याशी जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. धानोरकर कुटुंबियांच्या दबावामुळे कोर्टात (Court) केस जिंकूनही जमीन त्यांच्या नावावर होत नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करण्यात यावा, अन्यथा परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. या मागणीमुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कुटुंबियांच्या या भूमिकेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Serious Allegations on Pratibha Dhanorkar : तिसऱ्या दिवशीही मृतदेह शवगृहातच!

दुसरीकडे, याच मुद्दयावरुन मेश्राम कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे? परिणामी परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवागृहातच आहे. मेश्राम यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कुटुंबीयांची भूमिका आहे. परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूस काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे भासरे अनिल धानोरकर जबाबदार आहे, असा कुटुंबियांनी आरोप केलाय. त्यामुळे आमच्या शेत जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करावा, धानोरकर कुटुंबीयांकडून ताबा मिळवून द्यावा आणि पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.

Chandrapur Farmer Suicide : नेमकं प्रकरण काय?

-भद्रावती तहसील कार्यालयात 26 सप्टेंबरला विष घेऊन शेतकरी परमेश्वर मेश्राम (55) यांचा आत्महत्येचा प्रयत्न

-चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात परमेश्वर मेश्राम यांचा काल (7 ऑक्टोबर) मृत्यू

-फेरफार करण्यास तहसील कार्यालयातुन सातत्याने टाळाटाळ होत असल्याने मेश्राम यांनी 26 सप्टेंबरला भद्रावती तहसील कार्यालयात केले विष प्राशन

-भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथे आहे परमेश्वर मेश्राम यांची वडिलोपार्जित 8.5 एकर जमीन, या जमिनी बाबत कोर्टात सुरू होती केस

– 2006 मध्ये परमेश्वर मेश्राम यांनी या जमिनीच्या विक्रीचा दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत केला होता विक्रीचा व्यवहार

-मात्र बाळू धानोरकर यांनी विक्रीचे पैसे दिले नाही आणि त्यांनी दिलेले चेक वारंवार बाउन्स झाले, असाही कुटुंबियांचा आरोप

अदृषूक म्हणून केला होता आत्महत्येचा प्रयत्न, मेश्राम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार, जमिनीचा फेरफार जोपर्यंत आमच्या नावावर होत नाही आणि शेतीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याची कुटुंबियांची भूमिका.

-त्यानंतर या प्रकरणात बाळू धानोरकर यांच्या विरोधात परमेश्वर मेश्राम यांनी केस दाखल केली आणि या केसचा निकाल परमेश्वर मेश्राम यांच्या बाजूने लागला.

-या केसचा निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागून देखील गेल्या 2 वर्षांपासून तहसील कार्यालयातून परमेश्वर मेश्राम नावे फेरफार करण्यास केली जात होती टाळाटाळ

-त्यामुळे त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी उचलले होते टोकाचे पाऊल

-या प्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर 3 ऑक्टोबरला निलंबनाची देखील झाली आहे कारवाई

https://www.youtube.com/watch?v=i1c8p_hblqg

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.