राज्यात बनावट कफ सिरपवर मोठी कारवाई, रेडिनेस्क फार्मसिटीकल कंपनीचा मोठा साठा जप्त


पुणे: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळं 19 बालके दगावल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे. अशातच अन्न व औषध प्रशासन विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. रेडनेक्स फार्मसिटीकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित केलेल्या खोकल्यावरील ‘रेसपिफ्रेश टी आर’ (Respifresh TR) या औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

FDA कडून कंपन्यांची आणि औषधांची तपासणी

बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर, मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांमधून खोकल्याच्या औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी गोळा केले जात आहेत, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली. हुकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, मध्य प्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने बालके दगावल्याचा संशय आहे, त्या औषधाचा साठा सध्या महाराष्ट्र राज्यात उपलब्ध नाही. दरम्यान, गिरीश हुकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली की, दोन वर्षांखालील लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप (खोकल्याचे औषध) दिले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

पालकांनी आणि डॉक्टरांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सध्या अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम राज्यभर सुरू असून, खोकल्याच्या औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे.

काय आहे डेक्सट्रोमथॉर्फन हायड्रोब्रोमाइड सिरप?

1950 च्या दशकात शोध लागलेले हे औषध सुरुवातीला कोडेन (कोडीन) याला पर्याय म्हणून वापरले गेले. हे मुख्यत्वे कोरड्या खोकल्यासाठी दिले जाते. याचा प्रभाव म्हणजे खोकल्याचे संदेश मेंदूपर्यंत जाण्यापासून रोखणे, ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो. केमिकल प्रोसेसिंग हे औषध तयार केले जाते आणि लहान मुलांना सहजपणे प्यायला यावे म्हणून ते सिरपच्या स्वरूपात दिले जाते. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (आप) आणि यूएस एफडीए ने स्पष्ट केले आहे की, चार वर्षांखालील मुलांना हे औषध देऊ नये. यामुळे श्वसनाचा त्रास, अत्यधिक झोप, चक्कर, फिट्स आणि मृत्यूचाही धोका संभवतो. काही अहवालानुसार दोन वर्षांखालील मुलांना हे औषध अजिबात देऊ नये तर 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना मर्यादित प्रमाणात आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्यावे. 6 वर्षांवरील व्यक्तींनी देखील डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच या औषधाचा वापर करावा असा सल्ला देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Cough Syrup : खोकल्याचं औषध की विष? जेनेरिक कफ सिरप प्यायल्याने 11 बालकांचा मृत्यू, पालकांनी काय सावधानता बाळगावी?

आणखी वाचा

Comments are closed.