सोन्या- चांदीची आवाक्याबाहेर भरारी! 10 ग्रॅम सोन्याचे दर बघून तोंडचे पाणी पळाले, किती पैसे मोजा
सोन्याची किंमत: सोने आणि चांदीच्या दराने सध्या टोक गाठले आहे. सण समारंभाच्या तोंडावर वाढलेल्या दरामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर सव्वा लाखांच्या घरात जाताना दिसत आहे. आज (9 ऑक्टोबर ) 1 लाख 22 हजार 810 रुपयांवर 24 कॅरेट सोन्याचा भाव पोहोचला आहे. तर एक किलो चांदीसाठी एक लाख 48 हजार 940 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, जळगावच्या सुवर्णनगरीत (Jalgaon) गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. जळगावात सोन्याचे दर 1 लाख 23 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम तर जीएसटीसह एक लाख 26 हजार 700 रुपयांवर जाऊन ठेपलाय. (Gold Silver Rates Today)
सोन्याच्या भावाचा ट्रेंड चढता राहणार?
तज्ञांच्या मते सध्या जागतिक भूराजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जगभरातील तज्ञ सोन्या- चांदीच्या या चढ्या ट्रेंडमागे अमेरिकेने केलेलं शटडाऊन प्रमुख कारण ठरल्याचं सांगितलं आहे. किमती वाढल्यामुळे जागतिक पातळीवर मागणीत घट झाली आहे. दागिन्यांच्या बाजारपेठेत ग्राहक वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचेच दिसत आहेत.
आज कोणत्या शहरात सोने कितीवर?
इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते, आज नवी दिल्ली मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव एक लाख 22 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीची किंमत एक लाख 48 हजार 840 रुपये प्रति किलो झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 12 हजार 466 रुपये असून तोळ्यामागे 1लाख 31 हजार 178 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईपुण्यात 24 कॅरेट सोन्याला 122,950 रुपये मोजावे लागत आहेत.
या वाढीमागे जागतिक आणि आर्थिक परिस्थितीचा मोठा प्रभाव असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. सध्या रशिया-युक्रेन युद्ध, इजरायल-गाझा संघर्ष आणि अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता यासारख्या घटनांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे लक्ष वेधले आहे. यामुळे मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत.
जळगावात सोनं महागलं, सुनील बाफना म्हणाले…
बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना म्हणाले, “गेल्या काही दिवसांत जागतिक घडामोडी आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे लोक सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. पुढील काळातही हा वाढीचा ट्रेंड सुरू राहण्याची शक्यता आहे.” सोन्याच्या दरातील सतत वाढ लक्षात घेतल्यास, आर्थिकदृष्ट्या विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा काळ सोन्यात गुंतवणुकीसाठी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरातील ही हालचाल नोंदवून गुंतवणूकदारांनी योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.