मी मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवू शकणार नाहीत, महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, रायगडम


सुनील तत्कारे वर महेंद्र दालवी: “मी मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवण्यालायक राहणार नाहीत,” अशा ठाम शब्दांत आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहा येथील युवा प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तर, रोहेकरांना आता काहीच कमी पडू देणार नाही. त्यामुळे रोहामधील जनतेने आता सज्ज व्हा, अशी भूमिका देखील आमदार महेंद्र दळवी यांनी मांडली. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात येऊन दळवींनी तटकरेंना हा दिलेला इशारा आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळं वळण घेण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mahendra Dalvi: मी भरत गोगावले यांचा शिष्य, शून्यातून वर आलोय

आमदार महेंद्र दळवी म्हणाले, “मी अनेक केसेस डोक्यावर घेऊन आमदार झालोय. त्यामुळे यापुढे जर कोणी आमच्या कार्यकर्त्यांना फोनवर त्रास दिला, किंवा काही बोलले, तर ते कदापि सहन केले जाणार नाही,” असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी विरोधकांना दिला आहे. तर “मी भरत गोगावले यांचा शिष्य आहे. आम्ही वारकरी. त्यामुळे मैदानात यायला वेळ लागतो, पण आलो की थेट धडक देतो. मुरुडनंतर आता रोहा दत्तक घेतलं आहे. येथील जनतेच्या हक्कासाठी लढणार आहे. महिलांचा आदर करणारे कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. अन्याय झाल्यास मी तिथे ठामपणे उभा राहीन,” असे दळवी देखील यांनी स्पष्ट केले.

Mahendra Dalvi on Sunil Tatkare: तटकरे घराणे खालसा करायचंय

आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका लक्षात घेता, “या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तटकरे घराणे खालसा करायचं आहे. ते बाहेरच्यांना उमेदवारी देत नाहीत. सगळं घरातच ठेवलं जातं. कार्यकर्त्यांना फक्त ‘हाय-हॅलो’ करत बसायचं, असं तटकरे घराणं समजतं,” अशा शब्दांत दळवी यांनी तटकरेंवर सडकून टीका केली.

Mahendra Dalvi on Anil Tatkare: अनिकेत तटकरेंच्या वक्तव्याला दळवींचं प्रत्युत्तर

माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी महेंद्र दळवी यांच्यावर “चिटर” अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना दळवी म्हणाले, “तुझा बाप चिटर आहे,” अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला. या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Mahendra Dalvi on Elections: महायुती होईल, पण ताकद आमच्याकडेच

“आगामी निवडणुकांमध्ये महायुती, आघाड्या होत राहतील. पण येथे ताकद आमच्याकडेच आहे. त्यामुळे आम्ही वारंवार येथे येत राहू,” असे सांगत त्यांनी रायगडमधील आपली राजकीय उपस्थिती बळकट करण्याचा निर्धार केला. त्याचबरोबर, “रोहेकरांना आता काही कमी पडू देणार नाही. रोहा सज्ज व्हा,” असा संदेश त्यांनी उपस्थित जनतेला दिला. आता महेंद्र दळवी यांच्या टीकेवर सुनील तटकरे काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; Video

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Mama Rajwade Nashik Crime: ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या मामा राजवाडेंना मोठा धक्का, फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी 15 तास कसून चौकशी अन् अटक

आणखी वाचा

Comments are closed.