माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं; तो पळून गेला नाही; मी स्वत: विमानतळावर त्याला सोडायला


पुणे: पुणे कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती, या घटनेत घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीतील सदस्य होते, त्यांच्यासोबत गँगचा मास्टरमाईंड आणि पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ  (Nilesh Ghaywal) यांच्यावरती देखीलठपका ठेवण्यात आला, या घटनेचा तपास सुरू असतानाच निलेश घायवळ हा देश सोडून पळाला असल्याचं समोर आलं, त्यानंतर आता त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले आहे. अशातच गुंड निलेश घायवळ  (Nilesh Ghaywal) याची आई कुसुम घायवळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची निलेश घायवळची बाजू मांडली. घायवळ कुटुंबाची बाजू समोर येत नसल्याने निलेशच्या आई वडिलांनी उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल केले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत, त्याचबरोबर पोलिसांवरती देखील आरोप केले आहेत.

Nilesh Ghaywal Mother: माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं….

निलेश घायवळ याची आई कुसुम घायवळ यांनी म्हटलं की, माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं. तो पळून गेला नाही. मी स्वत: त्याला विमानतळावर सोडायला गेले होते. त्याने कोणताही पासपोर्टमध्ये घोटाळा केला नाही. राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी असं करत आहेत. निलेश घायवळला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर ज्या निवडणुका आल्या आहेत. त्याला निवडणुकीत उभं रहायचं होतं, असंही त्यांनी म्हटलंय आहे.

Nilesh Ghaywal Mother:मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही

पुढं त्या म्हणाल्या, नगर जिल्ह्यातील सोनेगावच्या जिल्हा परिषदतून निलेश उभं राहणार होता, मात्र विरोधकांनी कट रचून त्यांना अडकवल्याचा दावा निलेश घायवाळच्या आई कुसुम घायवळ यांनी केला आहे. सोनेगावमध्ये त्याला राजकारणात डोकं वार काढू दिलं जात नव्हतं, त्यामुळे त्याला त्रास दिला जात होता, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या, दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते. मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. मला दोन लेकरं आहेत. त्यांनी पळून जावे असे कोणात्या आईला वाटते. लेकरांनी खून करावा, असे कुणाला वाटते. पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला, असंही कुसुम घायवळ म्हटलं आहे.

Nilesh Ghaywal Mother: त्यापूर्वीच विरोधकांनी गेम केला

निलेश घायवळ याच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाला राजकारणात प्रवेश करायचा होता. तो नगर जिल्ह्यातील सोनेगाव जिल्हा परिषदेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. मात्र, निलेशने राजकारणात येऊ नये म्हणून विरोधकांनी त्याला बाजूला करण्याचे षडयंत्र रचले, असा दावा निलेशच्या आईने केला. निलेशला राजकारणाचे वेड आहे. दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते. मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. त्यांनी पळून जावे किंवा आपल्या मुलाने एखाद्याचा खून करावा, असे कोणत्या आईला वाटते? पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. पण राजकारणी लोक त्याला फसवतात, त्याने गुन्हेगारीतच राहावे, यासाठी ते प्रयत्न करतात, अशी खंत निलेश घायवळच्या आईने बोलून दाखवली.

आणखी वाचा

Comments are closed.