मेंदूला जोरदार किक देणारा अंमली पदार्थ शरीराच्या नसांमध्ये भिनला अन्..; त्या एका चुकीमुळे ‘झुं


झुंड अभिनेता बाबू छेत्री यांचे निधन झाले: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातील अभिनेता प्रियांशू क्षत्रिय ऊर्फ बाबू छत्री (Priyanshu Kshatriya) याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियांशूने या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेला ‘बाबू छत्री’ हा विनोदी पण प्रभावी पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिला होता.‘झुंड’ चित्रपटातून प्रियांशूने (Priyanshu Kshatriya) आपल्या नैसर्गिक अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. समाजातील वंचित तरुणांच्या कहाणीवर आधारित या चित्रपटात त्याची भूमिका वास्तवाशी जवळीक साधणारी होती. त्यामुळे प्रियांशूच्या मृत्यूच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीतील कलाकार, चाहत्यांमध्ये आणि नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांत मोठी खळबळ उडाली आहे. त्यांची भूमिका छोटीच होती. पण ती अनेकांच्या लक्षात राहिली. त्याच्याकडे टॅलेंट वाया गेला. गुन्हेगारीचा तो हकनाक बळी ठरला. मित्र ध्रुव साहूने त्याचे हातपाय दोरीने बांधून त्याचा निर्घृण खून केला आहे.(Priyanshu Kshatriya)

Jhund actor Babu Chhetri died:  स्वतःला बदलू शकला नाही

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांशूची (Priyanshu Kshatriya) पार्श्वभूमी गुन्हेगारी जगतातील असली, तरी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्याच्यातील अभिनयाची कला ओळखून त्याला ‘झुंड’ चित्रपटातून एक मोठं व्यासपीठ दिलं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत पडद्यावर झळकण्याची संधी प्रियांशूला मिळाली होती. मात्र, इतक्या मोठ्या संधीच्या सहवासात असूनही प्रियांशू आपला भूतकाळ विसरू शकला नाही किंवा स्वतःला बदलू शकला नाही.नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात हिरो बनलेला प्रियांशू वास्तवात मात्र गुन्हेगारी जगातून बाहेर पडू शकला नाही. शेवटी त्याच गुन्हेगारी वर्तुळात त्याचा अंत झाला. व्हिलनगिरीच्या नादात अडकलेल्या प्रियांशूचा मित्र ध्रुव साहूनेच त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आधी एकदा चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

Jhund actor Babu Chhetri died: एमडीच्या व्यवहारावरून त्याचा आणि मित्र ध्रुव साहूचा वाद

पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, त्याचा जीव गेला त्या दिवशी प्रियांशू आणि त्याचा मित्र ध्रुव साहू दोघंही एमडी ड्रग्जचं सेवन असताना दोघांमध्ये नशेतच वाद झाला होता. या वादात प्रियांशूने केलेल्या एका चुकीमुळे त्याचा जीव गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळूनही प्रियांशूच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. ‘झुंड’च्या शूटिंगनंतर अवघ्या काही दिवसांतच तो चोरीच्या प्रकरणात अडकला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्या घटनेनंतरही त्याने आपली चुकीची सवय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि व्यसन सोडलं नाही.त्यानंतर  दोन दिवसांपूर्वी बुधवारी (ता८) झालेल्या प्रियांशूच्या खुनामागेही त्याचं अमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित वाद कारणीभूत ठकला असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. एमडीच्या व्यवहारावरून त्याचा आणि मित्र ध्रुव साहूचा वाद झाला होता, आणि त्याच वादातून ही हत्या घडल्याची माहिती समोर आली आहे.

Babu in Jhund Movie: प्रियांशुला झुंड चित्रपटात रोल कसा मिळाला?

प्रियांशू क्षत्रिय याने एका कार्यक्रमात आपल्याला झुंड चित्रपटातील भूमिका कशी मिळाली, याचा किस्सा सांगितला होता. नागपूरमध्ये रेल्वेच्या ट्रॅकजवळच आमची वस्ती आहे. आमचं लहानपण तिथेच गेलं आहे. त्यावेळी मी ट्रेनमधून कोळसा पाडायचो आणि बाकीचे लोकं म्हणजेच माझी टीम ते जमवून विकायचे. त्याचवेळी नागराज मंजुळे यांची एन्ट्री झाली. मी त्यांना पाहिलं आणि मला वाटलं पोलीस आलेत म्हणून मी सर्वांना पळा असे म्हटलं. पण थोड्यावेळाने त्यांच्या हातात कॅमेरा बघितला, तेव्हा आम्हाला वाटलं की अरे हे न्यूज चॅनलवाले आहेत. पोलीस नाही. ते शुटिंग करत होते. त्यावेळी हळूच त्यांनी कॅमेरा आमच्या दिशेने वळवला. मी त्यांना विचारले, हे सर्व काय आहे. तर ते म्हणाले, आमचा प्रोजेक्ट चालू आहे. त्यावर मी पटकन म्हटलं, ते तुमचं प्रोजेक्ट वैगरे असू दे, पण यात वस्तीचे नाव टाकायचे नाही. यामुळे वस्तीचे नाव खराब होते. वस्ती माझी आहे. असे म्हटल्यानतंर ते हसू लागले आणि यानंतरच त्यांनी चित्रपटासाठी विचारणा केली, असे प्रियांशू उर्फ बाबू छत्रीने सांगितले.

आणखी वाचा

Comments are closed.