प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण, दुचाकीही पेटवली, तीन जणांना अटक
जलगाव गुन्हेगारीच्या बातम्या: जळगाव (Jalgaon) शहरातील मोहाडी रोड परिसरात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून ,एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्या तरुणाची दुचाकी देखील पेटवून दिली आहे. भुसावळ तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत मोहाडी रोडवरील एका दुकानाजवळ थांबला असताना काही तरुणांनी दोघांची विचारपूस केली. त्यानंतर या टोळक्याने संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याची दुचाकी पेटवून दिली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या घटनेतील जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.
सोलापुरात सशस्त्र चोरट्यांनी केलेली जबरी चोरी
सोलापूर (Solapur) शहरातील अभिषेक नगरमधील अवंती हौसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अडीचच्या वेळेस सशस्त्र चोरट्यांनी केलेली जबरी चोरी शहरात खळबळ माजवणारी ठरली आहे. शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना वेठीस धरून लुट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एका घरात घुसून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि घरमालक पुरुषाला मारहाण करत सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली. यानंतर ते खालच्या मजल्यावरील दुसऱ्या घरात घुसले, तिथेही तशाच प्रकारे धमकी देऊन चोरी केली.
चोरटे अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले, पोलिसांकडून तपास सुरु
पीडित कुटुंबातील पूजा अन्नदाते आणि स्नेहा राजपूत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, “रात्री अचानक काही लोक घरात घुसले आणि गळ्याला चाकू लावून धमकावलं. आमच्या नवऱ्याला मारहाण करत घरातील सोनं व पैसे लुटले. आम्ही अत्यंत घाबरले होतो. त्यानंतर ते चोरटे खालच्या घरात गेले आणि तिथेही तसंच केलं. या घटनेत चोरट्यांनी दोन घरे फोडण्यात यश मिळवले असले तरी, पोलिसांची वेळेवर हजेरी लागल्यामुळे इतर घरे लुटण्याचा प्रयत्न फसला. चोरटे अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, मात्र पोलीस त्यांच्या मागावर आहेत. घटनेची माहिती मिळताच सोलापूर गुन्हे शाखेच्या उपायुक्त आश्विनी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक तज्ज्ञ व गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, पुरावे गोळा करण्यात येत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Solapur Crime: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी; सोलापुरात मध्यरात्री दरोड्याचा थरार
आणखी वाचा
Comments are closed.