प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, त्याच चाकूने हत्या केली; पिंपरी चिंचवडमधील घटनेने खळबळ


पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याच्या घटनेने एका हत्येच्या घटनेने पिंपरी चिंचवड हादरली. ज्या चाकूने प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला त्याच चाकूने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. मेरी तेलगू असं हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव असून दिलावर सिंह असं आरोपी प्रियकराचे नाव आहे.

प्रेयसीचा वाढदिवस 10 ऑक्टोबर रोजी होता. तो साजरा करण्यासाठी आलेल्या प्रियकराने तिच्यासाठी केकही आणला होता. मात्र केक कापल्यानंतर त्या प्रियसीलाही ठार करण्यात आलं.

खून करा: नेमकं काय घडलं?

माझे तेलगू ही मुलगी डी मार्टमध्ये नोकरी करत होती. तर दिलावर सिंह हा एक हॉटेल व्यावसायिक आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र मेरी तेलगूचे आणखी कुणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय दिलावरला आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने मेरी आणि दिलावर हे वाकड येथील एका लॉजवर भेटले. 10 ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस असल्याने तिने केक कापून सेलिब्रेशनही केले. त्यानंतर त्याच चाकूने आणि ब्लेडने दिलावरने मेरीवर वार केले आणि तिची हत्या केली. मेरी ही तिसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा त्याला संशय आला आणि त्या संशयाने प्रेमाचा द एन्ड केला.

प्रेयसीची हत्या केल्यानंतर दिलावर थेट कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण

जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून ,एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्या तरुणाची दुचाकी देखील पेटवून दिली आहे. भुसावळ तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत मोहाडी रोडवरील एका दुकानाजवळ थांबला असताना काही तरुणांनी दोघांची विचारपूस केली. त्यानंतर या टोळक्याने संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याची दुचाकी पेटवून दिली.

या घटनेतील जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.