डोनाल्ड ट्रम्प अन् दादा भुसेंचे घनिष्ट संबंध, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा…, गिरीश महाजनांन
नाशिक पालक मंत्री: नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून (Nashik Guardian Minister) सुरु असलेला राजकीय तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत स्पर्धा आता मिश्किल टोलेबाजीच्या नव्या रंगतदार वळणावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडेच न्यावा लागेल, असे मिश्कील वक्तव्य केले होते. आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत दादा भुसे यांना डिवचले आहे.
नाशिकचे पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्या विरोधामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांना ते पद सोडावे लागले. तेव्हापासून नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा सतत चर्चेत आहे. नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांनी बंद दाराआड चर्चा केली होती. या बैठकीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत तोडगा निघाला का? असा प्रश्न दादा भुसे यांना विचारण्यात आला होता. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी “हा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल,” असे मिश्किल उत्तर दिले होते. या विधानावर उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली होती.
Shiv Sena UBT on Dada Bhuse: ट्रम्प आधी तुम्हाला उभं करतात का बघा; ठाकरे गटाचा पलटवार
दादा भुसे यांच्या ट्रम्पसंदर्भातील वक्तव्य केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या पलटवार केला होता. “डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला दारात उभं करतात का ते आधी पाहा. सध्या ट्रम्प हे आपल्या देशाशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ज्या पद्धतीने वागत आहेत, आपल्या देशावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत, ते पाहता डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला जवळ तरी उभे करतात का ते पाहा, असे म्हणत ठाकरे गटाने दादा भुसेंवर टीका केली होती.
दादा भुसेवरील गिरीश महाजन: डोनाल्ड ट्रम्प कंडेन्स्ड रिलेशनशिप
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी देखील दादा भुसे यांना डिवचले. “भुसे यांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे घनिष्ठ संबंध कदाचित असतील. त्यामुळे ते ट्रम्प यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील किंवा फोन करून सांगतील की काही तरी करा म्हणून. माझे तसे कोणतेच संबंध अमेरिकेशी नाहीत किंवा मी तिकडे गेलोही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील माझी नाशिकचे पालकमंत्रीपद तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी चर्चा झालेली नाही,” असे म्हणत गिरीश महाजन यांनी दादा भुसेंना डिवचले.
Nashik Guardian Minister: कुंभमेळा जवळ येतोय, पण पालकमंत्रीपदाचा तिढा कायम
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रीपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भाजपचे गिरीश महाजन, शिंदे गटाचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे हे चारही नेते नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत. तिढा न सुटल्यामुळे चारही मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देण्यात आले असून, गिरीश महाजन यांना समितीप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. यावरून पक्षांतर्गत मतभेद जाणवत आहेत. आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा नेमका कधी सुटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.