6 वर्षांचे प्रेमसंबंधात अन् विश्वासघात; प्रेयसीच्या मोबाईलमध्ये परपुरुषासोबतचे अश्लील फोटो, संत


पिंपरी : वाकड परिसरामध्ये प्रियकराने प्रेयसीचा चाकू व लोखंडी पानाने निर्घृण खून (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काळाखडक परिसरात लॉजमध्ये (Pune Crime News) शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिलावर सिंग (वय २५, रा. पिसोळी, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. तर मेरी मल्लेश तेलगु (वय २६, रा. देहूरोड) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. (Pune Crime News)

Pune Crime News: व्यक्तीसोबत संबंध ठेवत असल्याचा त्याला संशय

पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचे मेरी तेलगु हिच्यासोबत प्रेमसंबंध (Pune Crime News)होते. मात्र ती त्याचा विश्वासघात करून दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असल्याचा त्याला संशय होता. दरम्यान, शनिवारी त्याने तिला वाकड येथील काळाखडक परिसरातील लॉजमध्ये नेले, तिथे तिचा वाढदिवसाचा केक कापला. नंतर तिचा मोबाईल पाहिल्यावर त्यात दुसऱ्या पुरुषासोबतचे अश्लील फोटो आढळले. यामुळे संतापलेल्या संशयिताने सोबत आणलेल्या चाकू व लोखंडी पानाने वार करून तिचा खून केला. त्यानंतर संशयित हा पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात गेला. आपण खून केला असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांना कोंढवा पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. वाकड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. लॉजमधील खोलीत तरुणीचा मृतदेह आढळला. मृतदेह पाठवण्यात आला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.(Pune Crime News)

Pune Crime News: संशयिताचा मेरी तेलगु हिच्यासोबत प्रेमसंबंध

प्रेमसंबंधातून संशय निर्माण झाल्याने प्रियकराने तरुणीचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचा मेरी तेलगु हिच्यासोबत प्रेमसंबंध होता. मात्र ती दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असल्याचा संशय त्याला होता. या संशयातूनच संतापाच्या भरात त्याने तिच्यावरती वार केले.

Pune Crime News: दुसऱ्या व्यक्तीसोबतचे अश्लील फोटो आढळले

शनिवारी संशयिताने मेरीला वाकड येथील काळाखडक परिसरातील एका लॉजमध्ये नेले. दोघांमध्ये काही वेळ चर्चा सुरू होती. याच दरम्यान त्याने तिचा मोबाईल तपासला असता त्यात दुसऱ्या व्यक्तीसोबतचे अश्लील फोटो आढळले. हे पाहताच तो संतापला आणि संतापाच्या भरात त्याने सोबत आणलेल्या चाकू आणि लोखंडी पानाने तिच्यावर वार केले. या हल्ल्यात मेरीचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयिताने स्वतःहून पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

कोंढवा पोलिसांनी तत्काळ ही माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना कळवली. त्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लॉजमधील खोलीत मेरीचा मृतदेह आढळला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime News: वाढदिवसाचा केक कापला अन् त्याच चाकूने हत्या

लॉजमध्ये प्रियकर दिलावर सिंग याने प्रेयसीची मेरी हत्या केली. त्यापूर्वी त्याने तिचा वाढदिवस (बर्थडे 10 ऑक्टोबर ला होता) साजरा केला. त्यानंतर चाकू आणि धारदार शस्त्राने वार करत प्रियकराने तिची हत्या केली. वाकड येथील लॉजवर शनिवारच्या दुपारी ही घटना घडली. प्रेयसी त्रयस्थ व्यक्तीच्या प्रेमात पडली, असा संशय प्रियकराला होता. हत्या केल्यानंतर प्रियकर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. डी-मार्टमध्ये काम करणारी मेरी आणि हॉटेल व्यावसायिक दिलावरच्या प्रेमात पडली. सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवरुन त्यांची मैत्री झाली, पुढं एकमेकांवर प्रेम जडलं आणि अशा प्रकारे या लव्ह स्टोरीचा दि एंड झाला.

आणखी वाचा

Comments are closed.