बाबर आझमला रमीझ राजा नको नको ते बोलला; माईक सुरु राहिला अन् सगळं समोर आलं, नेमकं काय म्हणाला?


बाबर आझम लाइव्ह टीव्हीवरील रमीझ राजा: पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कमेंट्रीदरम्यान त्यांनी बाबर आझमबाबत (Babar Azam) असे काही वक्तव्य केले की, त्यावरून मोठा वाद पेटला आहे. ही घटना पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa 1st Test) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत घडली. बाबर फलंदाजी करत असताना एका अपीलवर त्याला आऊट दिलं गेलं, त्यावेळी रमीज राजांचा माइक चालू होता आणि त्यांनी जे काही बोलले ते सर्वांनी ऐकले.

हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरू आहे. रविवारी कसोटीचा पहिला दिवस खेळला गेला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अब्दुल्ला शफीक लवकर बाद झाल्यानंतर इमाम-उल-हक (93) आणि शान मसूद (76) यांनी 161 धावांची भागीदारी केली. मात्र बाबर आझम पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने केवळ 23 धावा केल्या आणि सायमन हार्मरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला.

रमीज राजांनी बाबर आझमला म्हटले ‘ड्रामेबाज’…

पाकिस्तानच्या 49व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबरने बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला न लागता थेट यष्टिरक्षकाच्या हातात गेला. आफ्रिकन खेळाडूंनी अपील केलं आणि अंपायरने लगेच आऊटचा निर्णय दिला. बाबरने तत्काळ डीआरएसची मागणी केली. त्यावेळी कमेंट्री बॉक्समध्ये रमीज राजा बोलत होते. माइक बंद करायचा विसरून ते म्हणाले, “हा आऊट आहे, आता ड्रामा करेल.” पण रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं की चेंडू आणि बॅटचा काहीही संपर्क झाला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या अंपायरने निर्णय मागे घेतला आणि बाबर आझमला ‘नॉट आऊट’ ठरवलं. या घटनेनंतर रमीज राजांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

बाबर आझम पुन्हा एकदा अपयशी ठरला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत बाबर आझमचा खराब फॉर्म कायम राहिला, त्याने 48 चेंडूत चार चौकारांसह 23 धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या 163/1 होती, परंतु मसूद बाद झाल्यानंतर इमाम 199 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर बाबर आझम 199 धावांवर बाद झाला, ज्यामुळे पाकिस्तानला पाचवा धक्का बसला. पण, मोहम्मद रिझवान (62) आणि सलमान अली आघा (52) यांच्यातील शतकी भागीदारीने पाकिस्तानला सावरले. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस पाकिस्तानने पाच गडी गमावून 313 धावा केल्या होत्या.

हे ही वाचा –

Vaibhav Suryavanshi Vice-Captain Bihar Team : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फोडून काढणाऱ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, डायरेक्ट ‘या’ संघाचा उप-कर्णधार बनवलं

आणखी वाचा

Comments are closed.