पतीच्या छळाला कंटाळून माहेरी आलेल्या विवाहितेसोबत प्रेमसंबंध, पण लग्नाला नातेवाईकांचा विरोध, तर


परभणी : प्रेमसंबंधात आलेल्या नैराश्यामुळे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे रविवारी उशिरा रात्री एक तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची (Parbhani Crime News) धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव माणिक कारभारी खोसे (वय २५) असे असून, आत्महत्येपूर्वी (Parbhani Crime News)त्याने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावनिक संदेश ठेवला आणि तो नातेवाइकांनाही पाठविला होता.(Parbhani Crime News)

Parbhani Crime News: या नातेसंबंधाला नातेवाइकांकडून तीव्र विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, माणिक खोसे याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. संबंधित महिला पतीच्या छळाला कंटाळून माहेरी राहू लागली होती. या काळात माणिक आणि त्या महिलेमधील नातं अधिक दृढ झाले आणि ते विवाहापर्यंत पोहोचले होते. मात्र, या नातेसंबंधाला नातेवाइकांकडून तीव्र विरोध झाला. सततच्या या विरोधामुळे माणिक मानसिक तणावाखाली आला होता. अखेर नैराश्याच्या भरात त्याने रविवारी रात्री सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास रखळगाव शिवारात धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवलं.

Parbhani Crime News:व्हॉट्सअॅप स्टेटसमधून मानसिक तणाव आणि प्रेमभंगातून…

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, हवालदार मधुकर जाधव आणि पोलिस कॉन्स्टेबल जिवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन तो नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. तर माणिकने ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटस आणि संदेशांमधून त्याचे मानसिक तणाव आणि प्रेमभंगातील अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत असल्याचे समजते.

Mumbai Crime News: सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावलेल्या २० वर्षीय तरुणाने आत्महत्या

सायबर फ्रॉडमध्ये १.८० लाख रुपये गमावलेल्या २० वर्षीय तरुणाने नैराश्यपोटी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपर-विक्रोळी दरम्यान धावत्या लोकल खाली जीवन संपवलं आहे. घटनेच्या तीन महिन्यांनी सायबर ठकांविरोधात कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३१८, १०८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. १७ जुलैला झालेल्या विवेक तेटे याने धावत्या लोकल खाली येत आत्महत्या केली होती. चौकशीत सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावल्यामुळे आत्महत्या केल्याचं समोर येताच गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत रक्कम दुप्पट करून देण्याच आमिष दाखवून तरुणाला जाळ्यात ओढलं होतं.

आणखी वाचा

Comments are closed.