मंदिराबाहेर दोघे बसले, अचानक बॉयफ्रेंडनं हातोडा काढला, सपासप वार केले अन् दगडाने…; अलिबाग हा


रायगड: रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अलिबागमधील कणकेश्वर मंदिरात बसलेल्या एका तरुण आणि तरुणी यांच्यात वाद झाला आणि या वादातून या तरुणाने आपल्या प्रेयसीवर (Crime News) बॅगेत घेऊन आलेल्या हातोड्याने थेट वार (Crime News) केले. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी (Crime News) झाली असून तिच्यावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. या वादाचं (Crime News) कारण प्रेयसी दुसऱ्या एका तरुणाशी बोलल्याच्या संशयावरून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सुरज शशिकांत बुरांडे असं या तरुणाचे नाव असून तो अलिबागमधील थेरॉड येथील बाजारपेठ येथे राहणारा आहे. त्याच्यावर या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पुढील चौकशी अलिबाग पोलिस करत आहेत.(Crime News)

गुन्हेगारीची बातमी: लोह हातोडा शपथ घेतो.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधांमध्ये आलेल्या संशयामुळे या तरुणाने आपल्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी कनकेश्वर मंदिर परिसरात घडली. सुरज शशिकांत बुरांडे (वय २८, रा. वरसोलपाडा, थेरॉडा बाजारपेठ, ता. अलिबाग, जि. रायगड) या युवकाने प्रेयसी संचिता विनायक सलामत (वय २१, रा. थेरॉडा बाजारपेठ, ता. अलिबाग) हिच्यावर लोखंडी हातोड्याने घाव घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Crime News: संशयातून रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय सुरजच्या मनात निर्माण झाला होता. या संशयातून रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर हल्ला केला. दोघे कनकेश्वर मंदिराजवळील वडाच्या झाडाखाली बसले असताना, सुरजने अचानक बॅगेतून लोखंडी हातोडा काढला आणि संचिताच्या डोक्यावर व कपाळावर जबरदस्त घाव घातले. इतक्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर तिला जवळच्या तारेच्या जाळीत ओढून नेऊन दगडाने मारहाण केली. ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली असतानाही आरोपीने तिला जवळपास तीन तास तिथेच ठेवले. या काळात तिला कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. संचिताला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. १८४/२०२५ भा.दं.सं.च्या कलम ३०७ (हत्या प्रयत्न) तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.